TRENDING:

Do You Know : हॉटेल रुममधील भिंतीवर का दिसत नाही घड्याळ? हॉटेलवाल्यांचा 'माईंड गेम' अखेर समोर

Last Updated:
तुम्ही कुठेही गेलात तरी तिथे रहाणं, म्हणजे झोपण्यासाठी, आराम करण्यासाठी, फ्रेश होण्यासाठी आणि सामान ठेवण्यासाठीही एक खोली हवीच. यासाठी लोक हॉटेल बुक करतात.
advertisement
1/9
हॉटेल रुममधील भिंतीवर का दिसत नाही घड्याळ? हॉटेलवाल्यांचा 'माईंड गेम' अखेर समोर
आजकाल लोक वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात. कोरोना काळानंतर बाहेर फिरायला जाण्याचा ट्रेंड वाढलाच आहे. आता फक्त कॉलेजला जाणारे तरुण-तरुणच नाही तर सगळ्याच वयोगटातील लोक फिरायला जाऊ लागले आहेत. नवीन ठिकाणी जाणं, रहाणं तिथलं जेवण खाणं यात मजा काही औरच आहे.
advertisement
2/9
पण तुम्ही कुठेही गेलात तरी तिथे एक गोष्ट नक्कीच येते. ती म्हणजे रहाणं, म्हणजे झोपण्यासाठी, आराम करण्यासाठी, फ्रेश होण्यासाठी आणि सामान ठेवण्यासाठीही एक खोली हवीच. यासाठी लोक हॉटेल बुक करतात. त्यात आपल्याला गरजेच्या सगळ्या वस्तू असतात. बेड, सोफा, टीव्ही, गिझर, नळ, पाणी, पंखा, एसी वैगरे...अगदी बाथरूममधील टॉवेलपासून ते मिनीबारपर्यंत गोष्टी असतात. काही तर असे स्टे देखील असतात जिथे किचन आणि त्याच्याशी संबंधीत गोष्टी उपलब्ध असतात.
advertisement
3/9
पण तुम्ही कधी हॉटेल रुममध्ये घड्याळ पाहिलंय का? आता असा प्रश्न विचारल्यावर तुमच्या डोक्यात ट्यूब पेटली असेल की अरे.... खरंच हॉटेल रुममध्ये कधीच घड्याळ नसतं. पण असं का?
advertisement
4/9
खरंतर हे हॉटेल मालक किंवा ओनरकडून मुद्दाम केलं जातं. आता तुम्ही विचार करत बसाल की मुद्दाम का? त्यात मुद्दाम करण्यासारखं असं काय आहे? पण यामागे एक व्यवसायिक कारण आहे आणि ते अगदी कल्पनाही न करता येईल असं आहे.
advertisement
5/9
हॉटेलमध्ये घड्याळ का नसतं?अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत हॉटेल साख्यांनी जाणूनबुजून त्यांच्या रूम्समध्ये घड्याळ ठेवत नाहीत आणि यामागचं मुख्य कारण म्हणजे ग्राहकांना 'वेळेचा विसर' पडावा.
advertisement
6/9
हॉटेल व्यवस्थापन असं मानतं की जर खोलीमध्ये वेळ दाखवणारं साधन नसेल, तर तिथं राहणारा व्यक्ती कोणत्याही घाईत नसतो. तो जास्त वेळ आराम करेल, वेळ किती झाला, मी किती वेळ वाया घालवला, याचा ती व्यक्ती अजिबात विचार न करा, रुममधील सेवांचा आनंद घेईल. यामुळे ग्राहकाचा राहण्याचा कालावधी वाढतो आणि अर्थातच हॉटेलचा महसूल देखील.
advertisement
7/9
ग्राहक जेव्हा वेळेच्या तणावापासून दूर राहतो, तेव्हा त्याला हॉटेलचा अनुभव अधिक सुखद वाटतो. त्याला 'चेकआउट' किंवा 'ऑफिस मीटिंग' याचा विसर पडतो आणि तो हॉटेलमध्ये जास्त वेळ घालवतो.
advertisement
8/9
यामुळे हॉटेलमधील रेस्टॉरंट, स्पा, मिनीबार यांसारख्या अतिरिक्त सेवांचा उपयोग होतो. जे हॉटेलसाठी फायदेशीर ठरतं.
advertisement
9/9
आता पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही हॉटेलच्या खोलीत घड्याळ शोधाल आणि ते तिथं नसेल, तेव्हा समजून घ्या ही केवळ चूक नाही, तर एक रणनीती आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Do You Know : हॉटेल रुममधील भिंतीवर का दिसत नाही घड्याळ? हॉटेलवाल्यांचा 'माईंड गेम' अखेर समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल