TRENDING:

पृथ्वीचा फिरण्याचा वेग होतोय कमी, पृथ्वी फिरणंच बंद झाली तर काय होईल?

Last Updated:
Earth rotation speed : पृथ्वी स्वतःभोवती फिरते, ज्याला परिभ्रमण म्हणतात या परिभ्रमणाचा वेग कमी होत आहे, जर पृथ्वीची ही गती आणखी कमी होऊन पृथ्वीने फिरणंच बंद केलं तर काय होईल, याचा विचार केला आहे का?
advertisement
1/7
पृथ्वीचा फिरण्याचा वेग होतोय कमी, पृथ्वी फिरणंच बंद झाली तर काय होईल?
पृथ्वी परिभ्रमण करते म्हणजे स्वतःभोवती फिरते हे आपल्याला माहितीच आहे. पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला 24 तास लागतात. म्हणूनपृथ्वीवरील एक दिवस 24 तासांचा असतो.
advertisement
2/7
आता पृथ्वीच्या फिरण्याचा वेग कमी झाला आहे. पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग बदलत आहे, परंतु तो अतिशय संथ गतीने होत आहे.
advertisement
3/7
समुद्रातील प्रवाह, भरती-ओहोटी आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर खेचणाऱ्या वाऱ्यांमुळे निर्माण होणारं घर्षण हा पृथ्वीचा वेग कमी होण्याची कारणं आहेत.
advertisement
4/7
पण याचा पृथ्वीवर काय परिणाम होईल हे तुम्हाला माहीत आहे का? भविष्यात दिवस 24 ऐवजी 25 तासांचा होऊ शकतो.
advertisement
5/7
लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवरील दिवस अंदाजे 22 तासांचा होता. परंतु पृथ्वीची गती एक अब्ज वर्षांहून अधिक काळ मंदावली आहे, दिवस प्रत्येक शतकात सुमारे 2 मिलिसेकंदांनी वाढत आहेत.
advertisement
6/7
कोणत्याही बाह्य शक्तीशिवाय पृथ्वीचं फिरणं थांबवणं अशक्य आहे. परंतु जर पृथ्वी फिरणं थांबलं, तर वातावरण पृथ्वीच्या वेगाने फिरत राहिल.
advertisement
7/7
त्यामुळे झाडे आणि इमारतींसह पृष्ठभागावर स्थिर राहणाऱ्या गोष्टी जोरदार वाऱ्याने वाहू लागतील.  पृथ्वीवर प्रत्येक भागावर सहा महिने सतत दिवस आणि सहा महिने अंधार असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
पृथ्वीचा फिरण्याचा वेग होतोय कमी, पृथ्वी फिरणंच बंद झाली तर काय होईल?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल