Wedding News : लग्नाआधी आवडला नवरा, लग्नादिवशी म्हणे, त्याचं वजन वाढलं; नवरीने उचललं मोठं पाऊल
- Published by:Priya Lad
Last Updated:
Wedding News : लग्न मोडल्याची काही प्रकरणं आहेत. यामागील वेगवेगळी कारणं असतात. पण सध्या असं लग्न चर्चेत आलं आहे, ज्यात नवरीला लग्नात नवरदेव लठ्ठ वाटला म्हणून तिने लग्नच मोडलं आहे.
advertisement
1/5

उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील ही घटना. 29 वर्षांचा हा नवरदेव फॅशन डिझाईनर आहे. त्याच्या कुटुंबाचा लोखंडी वस्तूंशी संबंधित व्यवसाय आहे. तर वधू 25 वर्षांची. वधूने सांगितलं की आपण रात्री उशिरापर्यंत वरपक्षाची वाट पाहिली, ते उशिरा आले आणि त्यांनी हुंडा मागितला. ज्यामुळे आपण लग्नाला नकार देत लग्न रद्द केलं.
advertisement
2/5
तर वराने वधूचा हा आरोप फेटाळला आला. लग्नाच्या दिवशी आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला बधूच्या घरात ओलीस ठेवलं, आपल्याशी गैरवर्तन केल्याच त्याचं म्हणणं आहे. आपण लठ्ठ असल्याने हे लग्न मोडल्याचं त्याने सांगितलं.
advertisement
3/5
नवरदेव म्हणाला, साखरपुडा झाल्यापासून वधूच्या कुटुंब त्याच्या वजनावरून त्याला टोमणे मारत होते. पण वधूला माझ्या दिसण्याबाबत काहीच अडचण नव्हती, असं तिनं सांगितलं होतं. आम्ही एकत्र बाहेर फिरायलाही गेलो होतो.
advertisement
4/5
पण लग्नाच्या दिवशी तिने अचानक माझं वजन जास्त आहे आणि माझ्याशी लग्न करणार नाही असं सांगितलं. त्यानंतर वधूच्या कुटुंबाने हुंड्याचं नाटक रचलं आणि आता तडजोड म्हणून ते 50 लाख रुपये मागत आहेत, असा आरोप नवरदेवाने केला आहे.
advertisement
5/5
दरम्यान वधू आणि वर दोघांनीही पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दोघांचीही तक्रार नोंदवून घेतली आहे आणि तपास सुरू आहे. (सर्व फोटो प्रतीकात्मक : AI Generated)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Wedding News : लग्नाआधी आवडला नवरा, लग्नादिवशी म्हणे, त्याचं वजन वाढलं; नवरीने उचललं मोठं पाऊल