Couple Hotel : हॉटेलमध्ये रोमान्स करताय, मग कपलने या 5 गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात
- Published by:Priya Lad
Last Updated:
Couple Hotel Safety Tips : तुम्ही फक्त दोघंच आहात, हनीमून किंवा फिरायला जात आहात, हॉटेलमध्ये थांबणार आहात, तर मग हे तुम्ही वाचायलाच हवं.
advertisement
1/7

कुठे बाहेर जायचं म्हटलं की बहुतेक लोक हॉटेलमध्येच जातात. विशेषत: कपल्स तर हॉटेल्सच बुक करतात आणि हम तुम एक कमरे में बंद हो, असे प्रायव्हेट क्षण कपलला मिळाले की कपल त्यांचा पुरेपूर फायदा घेणार. फक्त दोघंजण म्हणजे रोमान्स आला. पण हॉटेलमध्ये रोमान्स करताना कपलने सावध राहायला हवं.
advertisement
2/7
प्राइवेट इन्वेस्टिगेटर डेविड जोन्स यांनी अशा काही ट्रिक सांगितल्या आहेत, ज्यामुळे हॉटेल रूममध्ये कपल्सचा रोमान्स सुरक्षित असेल.
advertisement
3/7
सगळ्यात आधी हॉटेल रूममध्ये जाताच लाईट बंद करा, पडदे बंद करा आणि तुमच्या फोनचा कॅमेरा विशेषतः फ्रंट कॅमेरा चालू करा. बरेच छुपे कॅमेरे अंधारात इन्फ्रारेड लाइट वापरतात, जो उघड्या डोळ्यांना दिसत नाही पण तुमच्या फोनच्या कॅमेऱ्यावर लाल किंवा जांभळ्या ठिपक्यांसारखा दिसतो किंवा रिमोटचं बटण दाबून रिमोट फिरवा त्यातही तुम्हाला ही लाइट दिसेल.
advertisement
4/7
दुसरं म्हणजे मोबाईलचा टॉर्च किंवा फ्लॅशलाइट ऑन करा आणि रूममध्ये फिरा. कॅमेरा लेन्सवर निळे किंवा जांभळं रिफ्लेक्शन दिसेल. जे काचेसारखं चमकेल.
advertisement
5/7
तिसरं म्हणजे बरेच कॅमेरे वाय-फायशी कनेक्ट होतात. फिंगसारखे अॅप डाउनलोड करा, जे नेटवर्कवर कनेक्टेड डिव्हाइसेस दाखवतं. जर तुम्हाला आयपी कॅमेरा, हिडन डिव्हाइस किंवा अज्ञात अशी काही विचित्र नावे दिसली तर हॉटेल वाय-फाय देखील तपासा.
advertisement
6/7
रूममधील अशा वस्तू तपासा ज्या वेगळ्याच ठिकाणी लावण्यात आल्या आहेत. जसं बेडरूममध्ये स्मोक डिटेक्टर, अलार्म घड्याळे, टेडी बेअर, पॉवर सॉकेट्स, एक्सटेंडर. जर काही विचित्र वाटत असेल तर त्याला हळूवारपणे स्पर्श करा किंवा झाकून टाका.
advertisement
7/7
पाचवं जर तुम्हाला खूप काळजी वाटत असेल, तर स्वस्त आरएफ डिटेक्टर किंवा लेन्स डिटेक्टर खरेदी करा, जे कॅमेऱ्याची रेडिओ फ्रिक्वेन्सी ओळखतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Couple Hotel : हॉटेलमध्ये रोमान्स करताय, मग कपलने या 5 गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात