TRENDING:

Election : मतदान करायला जायचंय, पण ऐनवेळी Voter Id सापडत नाहीये किंवा हरवलंय, मग काय करायचं?

Last Updated:
Mahanagar Palika Election 2026 : वोटिंग कार्ट किंवा मतदान ओळखपत्र नसतानाही तुम्हाला वोटिंग करता येऊ शकतं, त्यासाठी काय करावं लागेल ते पाहुयात.
advertisement
1/7
मतदानाला जायचंय, पण ऐनवेळी Voter Id सापडत नाहीये किंवा हरवलंय, मग काय करायचं?
राज्यभरात 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडत आहेत. मतदान करायला जाताना सोबत वोटर आयडी किंवा मतदान ओळखपत्र न्यावं लागतं. पण काही वेळा ऐनवेळी वोटर आयडी सापडत नाही, हरवलं आहे किंवा नोंदणी केली पण वोटर आयडी आलंच नाही, पण मतदान करायचं आहे, तर अशा वेळी करावं काय? या विषयी जाणून घेऊया.
advertisement
2/7
सरकारने 2021 मध्ये इलेक्ट्रॉनिक इलेक्टोरल फोटो आयडी कार्ड e-EPIC ही सुविधा लाँच केली आहेत. याला डिजी लॉकरवर अपलोड करून किंवा त्याची प्रिंट काढून हॉर्ड कॉपीच्या रुपात वापरता येऊ शकतं. यामुळे मतदारयादीमध्ये नाव असलेली कोणतीही व्यक्ती आपलं मतदान कार्ड ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करू शकते.
advertisement
3/7
घरच्याघरी नवीन मतदार कार्ड डाउनलोड करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. सर्वात अगोदर निवडणूक आयोगाच्या सर्व्हिस पोर्टलवर जाऊन आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाका. मोबाईल नंबरवर आलेल्या ओटीपीची नोंद केल्यानंतर व्हेरिफाय ऑप्शनवर क्लिक करा आणि लॉग इन करा.
advertisement
4/7
लॉग इन झाल्यानंतर e-EPIC डाउनलोड टॅबवर क्लिक करा आणि EPIC नंबर सिलेक्ट करा. EPIC नंबर टाकल्यानंतर राज्य निवडा. यानंतर वोटर आयडी कार्डचे तपशील दिसू लागतील. तिथे ओटीपी टाकून 'डाउनलोड e-EPIC' पर्यायावर क्लिक करून ते डाउनलोड करा. अशाप्रकारे घरच्याघरी तुम्ही डिजीटल वोटर आयडी डाउनलोड करू शकता. पुढील वापरासाठी तुम्ही त्याची प्रिंट काढून घेऊ शकता.
advertisement
5/7
मतदार ओळखपत्र नसतानाही तुम्ही मतदान करू शकता. पण अधिकृत मतदार यादीत तुमचं नाव असलं पाहिजे. जर तुमचं यादीत नाव असेल तर तुम्ही घरी येणाऱ्या निवडणूक स्लिपची प्रिंटआउट घेऊन जाऊन मतदान करू शकता. 4 जुलै 2025 च्या आदेशानुसार निश्चित केलेल्या 12 प्रकारच्या ओळखीच्या पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा दाखवल्यानंतर मतदान करता येईल.
advertisement
6/7
मतदार ओळखपत्र नसल्यास ग्राह्य धरले जाणारे 12 प्रकारचे पुरावे : पासपोर्ट, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, केंद्र शासन / राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम / स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचा फोटोसह आयडी, राष्ट्रीयकृत बँका किंवा टपाल खात्‍यामधील खातेदाराचं फोटो असलेलं पासबुक, अपंगत्वाचा दाखला, मनरेगा जॉब कार्ड, निवृत्त कर्मचाऱ्यांची अथवा त्यांच्या विधवा / अवलंबित व्यक्तींची फोटो असलेली निवृत्ती वेतन विषयक कागदपत्रे (उदा. पासबूक, प्रमाणपत्र इ.).
advertisement
7/7
लोकसभा / राज्यसभा सचिवालय तसंच विधानसभा / विधानपरिषद सचिवालय यांनी आपल्या सदस्यांना दिलेलं अधिकृत ओळखपत्र, स्वातंत्र्य सैनिकाचे छायाचित्र असलेलं ओळखपत्र केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे छायाचित्रासह कार्ड.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Election : मतदान करायला जायचंय, पण ऐनवेळी Voter Id सापडत नाहीये किंवा हरवलंय, मग काय करायचं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल