General Knowledge : Wi-Fi पासवर्ड टाकताच इंटरनेट कसं काय सुरू होतं बरं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
WiFi Internet Connection : मोबाईल, लॅपटॉपवर वायफाय पासवर्ड टाकताच काही सेकंदात इंटरनेट सुरू होतं. या काही सेकंदात खूप काही होतं. डेटा, सिग्नल, एन्स्क्रिप्शन आणि राऊटरचा हा संपूर्ण खेळ आहे.
advertisement
1/7

Wi-Fi हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. आपण मोबाईल किंवा लॅपटॉपवर Wi-Fi नेटवर्क निवडतो, पासवर्ड टाकतो आणि काही क्षणांतच इंटरनेट सुरू होते.
advertisement
2/7
पण कसं काय ना? वायफाय पासवर्ड टाकताच इंटरनेट कसा काय सुरू होतं. या काही सेकंदांत नेमकं काय घडतं? याचा तुम्ही विचार केला आहे का?
advertisement
3/7
सर्वप्रथम आपला मोबाईल आसपास असलेली Wi-Fi नेटवर्क्स शोधतो. प्रत्येक नेटवर्कला SSID (Service Set Identifier) म्हणजेच नाव असते. आपण त्या नेटवर्कवर क्लिक केल्यावर आपला डिव्हाइस त्या राउटरशी संपर्क साधतो. यानंतर आपण टाकलेला पासवर्ड तपासण्याची प्रक्रिया सुरू होते.
advertisement
4/7
राउटर आणि मोबाईल यांच्यात एक ऑथेंटिकेशन हँडशेक होतं, ज्यात दोघं एकमेकांना ओळख पटवतात. जर पासवर्ड योग्य असेल, तर दोघं मिळून एक एन्क्रिप्शन की तयार करतात. यामुळे नेटवर्कवरील माहिती सुरक्षित राहते आणि कोणी तिसरा व्यक्ती ती वाचू शकत नाही.
advertisement
5/7
पुढे राउटर मोबाईलला एक IP Address देतो. हा पत्ता इंटरनेटवरील तुमची ओळख असतो. या प्रक्रियेला DHCP म्हणतात. आता तुमचं उपकरण लोकल नेटवर्कमध्ये जोडलेलं असतं.
advertisement
6/7
जेव्हा तुम्ही Google किंवा YouTube उघडता, तेव्हा तुमचा डेटा राउटरमार्फत ISP (Internet Service Provider) कडे जातो. ISP त्या वेबसाइटचा डेटा शोधून पुन्हा तुमच्याकडे पाठवतो. या प्रवासात DNS म्हणजे Domain Name System देखील काम करतं, जे वेबसाइटचं नाव त्याच्या IP मध्ये बदलतं.
advertisement
7/7
ही संपूर्ण प्रक्रिया फक्त काही सेकंदांत पूर्ण होते. म्हणूनच, योग्य पासवर्ड, चांगला सिग्नल आणि कार्यरत राउटर असेल तर इंटरनेट सहज चालू होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
General Knowledge : Wi-Fi पासवर्ड टाकताच इंटरनेट कसं काय सुरू होतं बरं?