TRENDING:

Mobile Interesting Facts : OTP फक्त कॉपी केला की तो आपोआप Paste कसा काय होतो?

Last Updated:
How Mobile OTP Autofill Work : मी OTP कॉपी केला आणि अ‍ॅपने आपोआप पेस्ट किंवा डिटेक्ट कसा केला? हा प्रश्न खूप जणांना पडतो.  यामागे थोडं OS-level स्मार्ट तंत्रज्ञान आणि सिक्युरिटी नियम असतात.
advertisement
1/9
Mobile Interesting Facts : OTP फक्त कॉपी केला की तो आपोआप Paste कसा काय होतो?
आजकाल आपण बँकिंग, यूपीआय, सोशल मीडिया किंवा कोणत्याही लॉगिन अ‍ॅपमध्ये OTP टाकताना एक गोष्ट हमखास अनुभवतो, OTP कॉपी केला की तो आपण पेस्ट न करता आपोआप पेस्ट होतो. कधी कधी तर SMS उघडायचीही गरज नसते. हा प्रकार नेमका कसा होतो? यामागे कोणतं तंत्रज्ञान काम करत असतं? आणि हे सुरक्षित आहे का?
advertisement
2/9
OTP म्हणजे काय? तर One Time Password म्हणजे एकदाच वापरता येणारा पासवर्ड. तो ठराविक वेळेसाठीच वैध असतो आणि वापरल्यानंतर निष्क्रिय होतो. त्यामुळे OTP हे ऑनलाइन व्यवहारांसाठी अत्यंत सुरक्षित मानलं जातं.
advertisement
3/9
जेव्हा आपण एखादा मजकूर, नंबर किंवा ओटी कॉपी करतो, तेव्हा तो मोबाईलच्या क्लिपबोर्डमध्ये जातो. Clipboard ही तात्पुरती मेमरी असते जिथे शेवटचा कॉपी केलेला मजकूर काही वेळासाठी साठवला जातो.
advertisement
4/9
अनेक अ‍ॅप्स OTP टाकण्याचा स्क्रीन उघडला की क्लिपबोर्डमधील डेटा तपासतात. जर तिथं 4, 6 किंवा 8 अंकी नंबर आढळला, तर अ‍ॅपला समजतं की हा OTP असू शकतो आणि तो आपोआप OTP बॉक्समध्ये भरला जातो.
advertisement
5/9
अ‍ॅप्स फक्त नंबर पाहत नाहीत तर ते पॅटर्न ओळखतात. उदाहरणार्थ OTP सहसा 4 ते 8 अंकी असतो, OTP, code, verification असे शब्द आसपास असतात, तो नंबर नुकताच कॉपी केलेला असतो या सगळ्या गोष्टी जुळल्या तर अ‍ॅप ओटीपी ऑटो डिटेक्ट करतो. यालाच पॅटर्न रिकॉग्निशन टेक्नॉलॉजी म्हणतात.
advertisement
6/9
अँड्रॉईड मोबाईलमध्ये खास सुविधा असते, ती म्हणजे SMS Retriever API, SMS User Consent API. यात अ‍ॅप तुमचे पूर्ण SMS वाचत नाही. फक्त OTP असलेला संदेश ओळखतो आणि OTP थेट अ‍ॅपमध्ये भरतो. यासाठी SMS वाचण्याची परवानगी देण्याचीही गरज नसते. म्हणूनच Android वर OTP auto-fill खूप सहजपणे काम करतं.
advertisement
7/9
iPhone मध्ये सिक्युरिटी जास्त कडक असते. त्यामुळे अ‍ॅप्सना क्लिपबोर्ड किंवा एसएमवर थेट प्रवेश नसतो. इथं Apple  System-Level OTP Autofill काम करतं. जेव्हा SMS मध्ये OTP येतो, तेव्हा आयफोन स्वतः तो ओळखतो आणि कीबोर्डवर From Messages असा suggestion दाखवतो. यावर टॅप केलं की OTP आपोआप भरला जातो.
advertisement
8/9
सगळे OTP Auto-detect होत नाहीत? कधी कधी OTP auto-fill होत नाही. त्याची वेगवेगळी कारणं अशी असू शकतात. जसं की SMS चा फॉर्मेट योग्य नसतो, Sender ID ओळखलेला नसतो, अ‍ॅपने OTP API वापरलेलं नसतं, मोबाईलमध्ये Auto-fill बंद असतं, Clipboard permission deny केलेली असते.
advertisement
9/9
आता प्रश्न म्हणजे ही प्रोसेस सुरक्षित आहे का? योग्य आणि विश्वासू अ‍ॅप्ससाठी ही प्रोसेस सुरक्षित आहे. OTP फक्त काही सेकंदांसाठी वापरला जातो, एकदाच वैध असतो, कायमस्वरूपी कुठेही सेव्ह होत नाही. मात्र अनोळखी किंवा संशयास्पद अ‍ॅप्स OTP access मागत असतील तर सावध राहणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Mobile Interesting Facts : OTP फक्त कॉपी केला की तो आपोआप Paste कसा काय होतो?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल