Dog Attack : रस्त्यावर कुत्रा तुमच्या मागे लागला तर? 'या' छोटीशा ट्रिक शिका,100% सेफ राहाल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
कधी शाळेत जाणाऱ्या मुलांवर, कधी सकाळी वॉकला निघालेल्या नागरिकांवर हे कुत्रे अचानक झडप घालतात.
advertisement
1/8

आजकाल शहर असो वा गाव, रस्त्यावर चालताना प्रत्येकालाच एक भीती वाटते ती म्हणजे रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांची. कधी शाळेत जाणाऱ्या मुलांवर, कधी सकाळी वॉकला निघालेल्या नागरिकांवर हे कुत्रे अचानक झडप घालतात. अशा घटना आता केवळ बातम्यांपुरत्याच मर्यादित राहिलेल्या नाहीत, तर आपल्या आजूबाजूला रोज घडताना दिसतात. त्यामुळे प्रशासनाच्या उपाययोजनांबरोबरच, सामान्य नागरिकांनीही स्वतःचा बचाव कसा करावा हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं झालं आहे.
advertisement
2/8
चला जाणून घेऊ कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या बचावासाठी काही सोप्या टिप्सरस्त्यावर चालताना एखादा कुत्रा अचानक भुंकू लागला किंवा तुमच्या मागे लागला, तर घाबरून पळण्यापेक्षा शांत राहा. पहिली अट म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणे. तुम्ही जितके शांत राहाल, तितका कुत्रा गोंधळात पडतो.
advertisement
3/8
कधी कधी लोक घाबरून पळण्याचा प्रयत्न करतात, पण त्यामुळे कुत्रा अधिक आक्रमक होतो. अशा वेळी जागेवर स्थिर उभं राहणं योग्य ठरतं. जर हातात छत्री, पिशवी किंवा काठी असेल, तर ती पुढे धरून त्याला अंतर ठेवा. यामुळे कुत्रा पुढे झेप घेण्यापूर्वीच थांबतो.
advertisement
4/8
बाइकस्वारांसाठी विशेष काळजीअनेकदा कुत्र्यांचा एखादा टोळका अचानक बाइकच्या मागे धावताना दिसतो. अशा वेळी घाबरून वेग वाढवू नका, कारण त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. उलट, बाइक थांबवा. बाइक थांबताच बहुतेक वेळा कुत्रे स्वतःहून मागे हटतात.
advertisement
5/8
जर कुत्रा चावला किंवा त्याचे दात लागले असतील तर काय करावे?अनेकांना वाटतं की चावा लागला नाही, फक्त कुत्र्याने चाटलं किंवा त्याचा दात लागला तर काही होत नाही पण हे गैरसमज आहे. कुत्र्याच्या लाळेमधूनही रेबीज विषाणूचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रसंगी विलंब न करता जवळच्या रुग्णालयात जाऊन रेबीजचा इंजेक्शन घ्या.
advertisement
6/8
स्वतःचा बचाव करण्याचे काही उपायजर हल्ल्याची शक्यता वाटत असेल, तर जवळपास एखादी वस्तू (काठी, पिशवी, बाटली इ.) शोधा जी तुम्ही हवेत हलवून कुत्र्याला घाबरवू शकता. जर तुमच्याकडे काही खाण्याचं असेल, तर त्याचा छोटा तुकडा फेकून त्याचं लक्ष विचलित करा.
advertisement
7/8
विशेषज्ञ सांगतात की, कुत्रा जवळ येत असेल तर पळू नका उलट मोठ्याने आवाज करा किंवा मदतीसाठी ओरडा. हातांनी चेहरा आणि मान झाकून ठेवा, कारण हे शरीराचे संवेदनशील भाग असतात.
advertisement
8/8
शेवटी महत्त्वाचं : सतर्क राहा, पण घाबरू नकाआवारा कुत्र्यांचा प्रश्न हा प्रशासनासाठीच नव्हे तर नागरिकांसाठीही आव्हान आहे. त्यामुळे भीती न बाळगता योग्य ज्ञान आणि आत्मविश्वासाने वागणं हीच खरी सुरक्षिततेची गुरुकिल्ली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Dog Attack : रस्त्यावर कुत्रा तुमच्या मागे लागला तर? 'या' छोटीशा ट्रिक शिका,100% सेफ राहाल