Ice cream in marathi : आईस्क्रीमला मराठीत काय म्हणतात? शब्द वाचता वाचता बोबडी वळेल
- Published by:Priya Lad
Last Updated:
Marathi word for Ice cream : आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की, 'आईस्क्रीमलाही मराठी शब्द आहे? आम्ही तर याचा विचार पण केला नाही.' तर हो...
advertisement
1/8

आईस्क्रीम ही अशी गोष्ट आहे, जी महिला आणि मुलांसाठी सर्वात आवडीचा विषय आहे. लोक वेगवेगळ्या फ्लेवर्स किंवा टेस्टचे आईस्क्रीम खातात. त्याच चॉकलेट बहुतेक लोकांचा सर्वात आवडीचा फ्लेवर आहे.
advertisement
2/8
या शिवाय आईस्क्रीम हा वेगवेगळ्या फळांच्या फ्लेवर्समध्ये येतो. अनेकांना फळांच्या बदल्यात त्याचं आईस्क्रीम खायला आवडतात. ज्यामध्ये कोकोनट, मॅगो, चिकू, सीताफळ, पेरु या फळांचे आईस्क्रीम खूपच प्रसिद्ध आहेत.
advertisement
3/8
पण तुम्हाला जर विचारलं की आईस्क्रीमलाचा मराठीत अर्थ काय किंवा शब्द काय? तर तुम्हाला सांगता येईल?
advertisement
4/8
आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की, 'आईस्क्रीमलाही मराठी शब्द आहे? आम्ही तर याचा विचार पण केला नाही.' तर हो...
advertisement
5/8
तसे पाहाता थेट मराठीत आइस्क्रीमसाठी प्रचलित शब्द नाही, पण संस्कृतोद्भव प्रतिशब्द त्याला नक्कीच आहे.पयोहिम असे आईस्क्रीमचे संस्कृतात नाव आहे. आता याला थोडं सविस्तर समजून घेऊ. 'पयस्' म्हणजे दूध आणि 'हिम' म्हणजे भुसभुशीत बर्ष (snow) किंवा थंड. हा शब्द एका ऑन्लाइन संस्कृत शब्दकोशात आहे.
advertisement
6/8
आईस्क्रीमच्या मराठी शब्दाबद्दल कोरावर देखील एका वाचकानं उत्तर दिलं आहे. जो ऋग्वेदाचा वाचक आहे. त्यांनी त्यांचा एक शब्द आईस्कीमसाठी तयार केला आहे.
advertisement
7/8
शरोशीन: किंवा शरशीन. 'शरस्/शर' म्हणजे साय (cream) आणि 'शीन' म्हणजे घन बर्फ (ice). शब्दशः भाषांतर असल्यामुळे ice cream साठी हा शब्द अधिक समर्पक वाटतो. असं त्यांचं म्हणणं आहे.
advertisement
8/8
शिवाय काही विनोदात आईस्क्रीमसाठी आणखी एक शब्द वापरला जातो . तो म्हणजे 'दुग्धशर्करायुक्तशीतघनगोलगट्टू'. पण हे असे शब्द व्यावहारिक कधीच वापरात येत नाहीत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Ice cream in marathi : आईस्क्रीमला मराठीत काय म्हणतात? शब्द वाचता वाचता बोबडी वळेल