तुरुंगात जन्मलेल्या बाळाच्या जन्म दाखल्यात 'स्थळ' काय लिहिलेलं असतं? 99 टक्के लोकांना माहित नसेल!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
जन्म दाखला म्हणजेच Birth certificate आपल्या आयुष्यात पदोपदी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं. अगदी शालेय शिक्षणापासून आपण उच्चशिक्षित होईपर्यंत जन्म दाखला महत्त्वाचा असतो. त्यावर आपला कधी, कुठे जन्म झाला याचा तपशील दिलेला असतो. जर एखाद्या रुग्णालयात जन्म झाला असेल तर त्या रुग्णालयाचं नाव लिहिलेलं असतं. पण तुम्ही कधी विचार केलाय का, तुरुंगात जन्मणाऱ्या मुलांच्या जन्म दाखल्यात जन्मस्थळ म्हणून कोणत्या ठिकाणाचं नाव असतं? (शाश्वत सिंह, प्रतिनिधी/ झाँसी)
advertisement
1/5

आपल्या भारतात आज लाखो लोक त्यांच्या वाईट कृत्यांची शिक्षा तुरुंगात भोगत आहेत. त्यात अनेक महिलांचाही समावेश आहे. काही महिला गुन्हेगार अशाही असतात ज्या गरोदर राहिल्यानंतर तुरुंगात बंदिस्त होतात. मग जेव्हा तिथंच त्यांची प्रसूती होते, तेव्हा जन्मणाऱ्या बाळाच्या जन्म दाखल्यावर काय माहिती लिहिली जाते याबाबत आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
advertisement
2/5
उत्तर प्रदेशातील झाँसी जिल्हा अधीक्षक विनोद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जन्म दाखलाच नाही तर बाळासंबंधित कोणत्याही कागदपत्रांवर तुरुंगाचा उल्लेख केला जात नाही. कारण शिक्षा त्याची आई भोगत असते, त्यामुळे त्याचा परिणाम बाळाच्या भविष्यावर होऊ नये एवढाच उद्देश्य असतो. मग त्याच्या जन्म दाखल्यात नेमकं लिहिलेलं असतं तरी काय?
advertisement
3/5
विनोद कुमार यांनी सांगितलं की, तुरुंगातील एखादी कैदी महिला गरोदर असेल तर प्रसूतीसाठी तिला रुग्णालयात नेलं जातं. बाळाच्या जन्मानंतर त्याच्या जन्म दाखल्यात जन्मठिकाणाच्या जागी त्या रुग्णालयाचाच पत्ता येतो.
advertisement
4/5
दरम्यान, एनसीआरबी म्हणजेच National Crime Records Bureauच्या डिसेंबर 2023मधील रिपोर्टनुसार, भारतातील एकूण 1 हजार 330 तुरुंगांमध्ये जवळपास 5 लाख 73 हजार 220 कैदी शिक्षा भोगत आहेत. त्यांमध्ये 23 हजार 772 महिलांचा समावेश आहे. त्यापैकी 1 हजार 537 महिला आपल्या मुलांसोबत तुरुंगात राहतात.
advertisement
5/5
महत्त्वाचं म्हणजे वर नमूद केलेल्या आकड्यातील बहुतांश महिलांनी आपल्या बाळाला तुरुंगात असतानाच जन्म दिला. परंतु म्हणून या मुलांच्या जन्म दाखल्यात तुरुंगाचा उल्लेख केलेला नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
तुरुंगात जन्मलेल्या बाळाच्या जन्म दाखल्यात 'स्थळ' काय लिहिलेलं असतं? 99 टक्के लोकांना माहित नसेल!