Indian Railway : ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर ‘X’ चिन्ह आणि लाल दिवा का असतो? 99 टक्के लोकांना कारण माहीत नाही
- Published by:Devika Shinde
Last Updated:
बहुतेकांना हे चिन्ह दिसतं, पण त्यामागचा अर्थ माहीत नसतो. आज आपण जाणून घेऊ या दोन छोट्या पण अतिशय महत्त्वाच्या रेल्वे संकेतांचं रहस्य.
advertisement
1/10

भारतीय रेल ही केवळ प्रवासाचं साधन नाही, तर देशाच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. दररोज लाखो प्रवासी आपल्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी रेल्वेवर अवलंबून असतात. पण तुम्ही कधी लक्ष दिलंय का, जेव्हा ट्रेन तुमच्यासमोरून वेगाने जाते, तेव्हा तिच्या शेवटच्या डब्यावर नेहमीच ‘X’ चिन्ह आणि ‘LV’ अशी अक्षरं लिहिलेली असतात? बहुतेकांना हे चिन्ह दिसतं, पण त्यामागचा अर्थ माहीत नसतो. आज आपण जाणून घेऊ या दोन छोट्या पण अतिशय महत्त्वाच्या रेल्वे संकेतांचं रहस्य.
advertisement
2/10
शेवटच्या डब्यावर ‘X’ का असतं?रेल्वे प्रशासनानं प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि ट्रेनच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी काही ठराविक नियम तयार केले आहेत. त्यापैकी एक नियम म्हणजे प्रत्येक ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर ‘X’ म्हणजेच क्रॉस चिन्ह असणं.
advertisement
3/10
हे चिन्ह रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा सिग्नल असतो. जेव्हा ट्रेन एखाद्या स्टेशनमधून जाते, तेव्हा प्लॅटफॉर्मवरील कर्मचारी या शेवटच्या डब्यावरचं ‘X’ पाहून खात्री करतात की संपूर्ण ट्रेन सुरक्षितपणे पुढे गेली आहे आणि कोणताही डबा मध्येच सुटलेला नाही.
advertisement
4/10
ट्रेन वेगाने जात असल्याने डब्यांची गणना करणे अशक्य असतं, म्हणूनच ‘X’ हे चिन्ह शेवटचा डबा ओळखण्यासाठी वापरलं जातं.
advertisement
5/10
शेवटच्या डब्यावरचं ‘LV’ म्हणजे काय?शेवटच्या डब्यावर ‘LV’ अशी अक्षरंही लिहिलेली असतात. याचा अर्थ आहे ‘Last Vehicle’, म्हणजेच “शेवटचा डबा.” हे चिन्हही रेल्वे कर्मचाऱ्यांना हे समजण्यास मदत करतं की ट्रेनचा शेवटचा डबा पार झाला आहे आणि गाडी पूर्णपणे स्टेशन सोडून गेली आहे.
advertisement
6/10
कधी कधी या शेवटच्या डब्यावर एक कर्मचारी दोन रंगांचे झेंडे घेऊन उभा असतो. हे झेंडे ट्रेनच्या हालचालीशी संबंधित संकेत देण्यासाठी वापरले जातात.
advertisement
7/10
लाल झगमगणाऱ्या दिव्याचा अर्थशेवटच्या डब्यावर तुम्ही एक लाल टिमटिमणारा दिवा (blinking red light) देखील पाहिलात का? हा दिवा रेल्वे ट्रॅकवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी संकेत असतो की ट्रेन त्या भागातून पार झाली आहे.
advertisement
8/10
विशेषतः धुके, पाऊस किंवा कमी दृश्यमानता असलेल्या हवामानात हा दिवा खूप उपयुक्त ठरतो, कारण त्यावरून ट्रेनची शेवटची मर्यादा स्पष्ट होते.
advertisement
9/10
सुरक्षा संकेत नसल्यास काय होते?जर ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर ‘X’, ‘LV’, किंवा लाल दिवा नसेल, तर ही स्थिती “असामान्य” मानली जाते. याचा अर्थ डबा सुटला असू शकतो किंवा ट्रेन पूर्णपणे स्टेशनमधून गेली नाही. अशा परिस्थितीत रेल्वे अधिकारी तत्काळ सावध केले जातात आणि तपास सुरू होतो.
advertisement
10/10
ही छोट्या दिसणाऱ्या पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या भारतीय रेल्वेच्या सुरक्षेचं आणि कार्यक्षमतेचं प्रतिक आहेत. त्यामुळे पुढच्यावेळी जेव्हा तुम्ही रेल्वे पाहाल, तेव्हा शेवटच्या डब्यावरचं ‘X’ आणि ‘LV’ चिन्ह नक्की लक्षात घ्या कारण तीच चिन्हं सांगतात की ट्रेन सुरक्षितपणे पुढे निघाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Indian Railway : ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर ‘X’ चिन्ह आणि लाल दिवा का असतो? 99 टक्के लोकांना कारण माहीत नाही