TRENDING:

Indian Railway : कोणती ट्रेन कोणत्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर येणार हे कसं ठरतं?

Last Updated:
Indian Railway Facts : सामान्यपणे प्रत्येक रेल्वे गाड्यांचे प्लॅटफॉर्म ठरलेले असतात पण काही वेळा अचानक ट्रेनचे प्लॅटफॉर्म बदलले जातात. ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार, कोणत्या प्लॅटफॉर्मवरून निघणार हे कसं ठरतं? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
advertisement
1/5
Indian Railway : कोणती ट्रेन कोणत्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर येणार हे कसं ठरतं?
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या, ट्रेन क्रमांक 1234 प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर येत आहे... रेल्वे स्टेशनवर अशी अनाऊंसमेंट तुम्ही ऐकली आहेच. काही वेळा अचानक ट्रेनचे प्लॅटफॉर्म बदलले जातात. ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार, कोणत्या प्लॅटफॉर्मवरून निघणार हे कसं ठरतं? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
advertisement
2/5
साधारणपणे रेल्वे कोणत्या प्लॅटफॉर्मवर जाणार हे नियोजित असतं. ज्या आधारे गाड्या प्लॅटफॉर्मवर थांबतात. पण काही कारणामुळे किंवा आपत्कालीन परिस्थितीत अचानक ट्रेनचा प्लॅटफॉर्म बदलला तर रेल्वे अधिकारी निर्णय घेतात.
advertisement
3/5
रेल्वे विभाग असेल तर विभागाचं कंट्रोल रूम आणि रेल्वे स्टेशन असेल तर स्टेशन मास्टर यासाठी जबाबदार असतो. ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर जाणार हे सिग्नल हे लोक देतात.
advertisement
4/5
ट्रेन स्टेशनवर येण्याआधी स्टेशन मास्टर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी बोलून ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर जाणार तसंच ट्रेनचा प्लॅटफॉर्म बदलण्याचा निर्णय घेतात. याव्यतिरिक्त स्टेशनवरील पॉइंटमन आणि गेटमन देखील यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
advertisement
5/5
निवृत्त रेल्वे अधिकारी एस.के. श्रीवास्तव यांनी सांगितलं की, कोणत्याही स्थानकावरील स्टेशन मास्टर हा अंतिम अधिकारी असतो, जो प्लॅटफॉर्मच्या भौतिक स्थितीनुसार ट्रेन थांबवायची की नाही हे ठरवतो. ट्रेनची लांबी, प्लॅटफॉर्म रिकामा आहे का? ट्रेनचा प्रकार आणि इतर कोणत्याही गाड्या आधीच स्टेशनवर आहेत का यासारख्या घटकांवर आधारित निर्णय घेतले जातात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Indian Railway : कोणती ट्रेन कोणत्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर येणार हे कसं ठरतं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल