TRENDING:

Railway Facts : रेल्वेत पांढऱ्या चादर, उशा का दिल्या जातात?

Last Updated:
White bedsheet in train : लोक शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे किंवा वस्तू घ्यायला घाबरतात कारण ते लगेच खराब होतात. प्रवासात तर लोक पांढरे कपडे घालतच नाहीत. मग अशावेळी रेल्वे पांढरे कपडे किंवा चादरी का देते?
advertisement
1/5
Railway Facts : रेल्वेत पांढऱ्या चादर, उशा का दिल्या जातात?
लांबच्या पल्ल्याच्या प्रवासाच्या वेळी, रेल्वेच्या काही श्रेणींमध्ये उशा आणि चादर दिले जातात. पांढरी चादर लवकर खराब दिसते. मग असं असलं तरी रेल्वे असं का करते?  तुम्ही कधी विचार केलाय का ही या उशा आणि चादरी या पांढऱ्या रंगाच्या का असतात?
advertisement
2/5
याचं पहिलं कारण म्हणजे रेल्वेतील यांची साफसफाई. साफसफाईच्या प्रक्रियेमध्ये 121 अंश सेल्सिअस तापमानात वाफ निर्माण करणाऱ्या मोठ्या बॉयलर मशीन्समध्ये हे कपडे टाकून साफ केले जाता.  बेडशीट पूर्णपणे निर्जंतुकीकरण झाल्याची खात्री करण्यासाठी 30 मिनिटांसाठी या वाफेमध्येच कपडा ठेवला जातो. अशा कठोर वॉशिंग परिस्थितीसाठी पांढरी बेडशीट अधिक योग्य असल्याचं आढळलं आहे.
advertisement
3/5
पांढऱ्या चादरींना प्रभावीपणे ब्लीच केलं जाऊ शकते, त्यांची चमक टिकवून ठेवता येते आणि वारंवार धुतल्यानंतरही फॅब्रिक स्वच्छ, चमकदार दिसते. ते ब्लीचिंगला चांगला प्रतिसाद देतात. अशावेळी रंगीत कपडे वापरले तर त्यांचा रंग उडून त्या खराब दिसतात.
advertisement
4/5
त्याशिवाय वेगवेगळ्या रंगांच्या चादरी वापरून, रंग एकमेकांना लागण्यापासून रोखण्यासाठी त्यांना स्वतंत्रपणे धुवावं लागेल. अशावेळ चादरी एकत्र धुतल्यास रंग दुसऱ्या चादरींना लागू शकतो, अशाने त्या खराब होतील, यामुळे देखील पांढऱ्या रंगाच्याच चादरी आणि उशांचे कवर वापरले जातात.
advertisement
5/5
खरंतर हे ट्रेनमधील बेडरोल आणि पिलो कव्हर, तसेच चादर दररोज धुतले जातात आणि ट्रेनमधील प्रत्येक प्रवाशाला ते फ्रेश दिले जातात पांढऱ्या बेडशीटची निवड करून भारतीय रेल्वे प्रवाशांना प्रदान केलेले तागाचे कपडे केवळ निर्जंतुक नसून ते दिसायलाही आकर्षक आहेत याची खात्री करते. (सर्व फोटो : फाइल)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Railway Facts : रेल्वेत पांढऱ्या चादर, उशा का दिल्या जातात?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल