TRENDING:

शांत घरात सासूला पाण्याचा आवाज, वाटलं सून अंघोळ करतेय, पण आत जाऊन पाहताच जे दिसलं ते अंगावर काटा आणणारं

Last Updated:
खरंतर नवं लग्न झालेलं जोडपं सात महिन्यांपासून एकत्र संसार करत होते. सगळं काही सुरळीत चाललं होतं, पण मग एक दिवस असं काही घडलं की सगळ्यांच्याच पायाखालची जमीनच सरकली.
advertisement
1/7
घरात शांतता, बाथरूममधून आवाज; सासूला वाटलं सून अंघोळ करतेय पण आत पाहिलं आणि...
लग्न झाल्यावर प्रत्येक मुलगी आपल्या सासरी जाते. तिथलं वातावरण, माणसं, सवयी तिथल्या परंपरा हे सगळं जुळवून घ्यायला थोडा वेळ जातो, पण हळूहळू ती नवीन घराशी आपलं नातं जोडायला लागते. अशावेळी तिच्या घरचे देखील तिला सावरायला थोडा वेळा देतात. पण कधीकधी काही प्रकरणात लग्नानंतर कहाणी वेगळंच वळण घेते.
advertisement
2/7
खरंतर नवं लग्न झालेलं जोडपं सात महिन्यांपासून एकत्र संसार करत होते. सगळं काही सुरळीत चाललं होतं, पण मग एक दिवस असं काही घडलं की सगळ्यांच्याच पायाखालची जमीनच सरकली.
advertisement
3/7
त्या दिवशी घरात फक्त वधू एकटीच होती. तिचा नवरा, सासू-सासरे तिघंही सकाळी घराबाहेर गेले होते. काही तासांनी जेव्हा सासू परत आली, तेव्हा घर शांत होतं. सून कुठे दिसत नव्हती. पण बाथरुममधून पाण्याचा आवाज येत होता. तेव्हा सासूला वाटलं की सून आंघोळ करत असेल, थोड्यावेळात बाहेर येईल.
advertisement
4/7
खूप वेळ झाला तरी आपली सून बाहेर का आली नाही? या काळीने सासू सुनेच्या रुममध्ये गेली तिथे तिला जे काही दिसलं ते हादरवणारं होतं कारण बाथरुममध्ये कुणीच नव्हतं.
advertisement
5/7
सासूला थोड्यावेळासाठी वाटलं की कदाचित कुठे बाहेर गेली असेल... पण मग लक्ष गेलं कपाटाकडे, त्याचं कुलूप उघडं होतं आणि कपाटातील सगळे सोन्याचे दागिने आणि जवळपास तीन लाख रुपये रोख गायब होते.
advertisement
6/7
ही घटना आहे उत्तर प्रदेशातल्या संबल जिल्ह्यातल्या हयातनगर भागातली असल्याचं सांगितलं जात आहे. सगळा प्रकार लक्षात येताच नवऱ्याच्या आईने पोलिसांत तक्रार दिली आहे की तिच्या सुनेने लग्न करून फसवणूक केली आणि सर्व किमती वस्तू घेऊन पळ काढला.
advertisement
7/7
पोलिसांनीही तपास सुरु केला आहे. सुनेचं हे चकवणारं नाटक आणि अचानक गायब होणं या सगळ्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे, तिने हे आधीच प्लॅन केलं होतं का? या सगळ्याचा पोलिस शोध घेत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
शांत घरात सासूला पाण्याचा आवाज, वाटलं सून अंघोळ करतेय, पण आत जाऊन पाहताच जे दिसलं ते अंगावर काटा आणणारं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल