TRENDING:

तुमच्या Birthday ला NASA ही देतंय गिफ्ट, कसं आणि कुठे? पाहण्यासाठी पटापट लिंकवर करा क्लिक

Last Updated:
NASA Birthday Gift : नासा ही अमेरिकेतील अंतराळ संस्था. पण तुम्हाला माहिती नसेल की नासा प्रत्येकाच्या वाढदिवसाला एक खास गिफ्ट देतं. अनेकांना याबाबत माहिती नाही. आता हे गिफ्ट कसं देते, कुठे देते हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल.
advertisement
1/5
तुमच्या बर्थडेला NASA ही देतंय गिफ्ट, कसं आणि कुठे? पाहण्यासाठी लिंकवर करा क्लिक
बर्थडे म्हणजे वाढदिवस प्रत्येकाच्या आयुष्यातील खास असा दिवस असतो. आपल्या या दिवशी सगळ्यांनी शुभेच्छा द्याव्यात, आपल्याला गिफ्ट द्यावं असं अनेकांना वाटतं. काही लोक तर स्वतःच्या बर्थडेसाठी इतके उत्साही असतात की स्वतःच आपल्याला काय गिफ्ट हवं हे सगळ्यांना सांगून ठेवतात. पण तुम्हाला माहिती आहे,  नासाही तुम्हाला बर्थडे गिफ्ट देतं.
advertisement
2/5
नासाकडून बर्थडे मिळणारं हे गिफ्ट म्हणजे हबल स्पेस टेलिस्कोप किंवा जेम्स वेब टेलिस्कोपने काढलेलेले अंतराळातील फोटो. ब्लॅक होल, चमकणारी आकाशगंगा, तेजोमेघ किंवा पृथ्वीवरून काढलेले फोटो यांचा समावेश आहे. जे तुम्हाला फ्री मिळतात.
advertisement
3/5
नासाच्या अधिकृत वेबसाइटवर 'अ‍ॅस्ट्रॉनॉमी पिक्चर ऑफ द डे' (APOD) विभागात जावं लागेल. इथं तुम्हाला तुमची जन्मतारीख आणि दिवस टाकायचा आहे. त्या तारखेला कोणते स्पेस फोटो काढले आहेत, ते तुमच्यासमोर येतील. उदा. जर तुमचा वाढदिवस 1 जानेवारी असेल, तर 2010 मध्ये हबलने 'द पिलर्स ऑफ क्रिएशन'चा फोटो काढला. हे वायूचे महाकाय स्तंभ आहेत जे नवीन तारे बनवतात.
advertisement
4/5
हे फोटो हाय रिझोल्यूशनमध्ये डाउनलोड केल्या जाऊ शकतात. यानंतर त्या प्रिंट करून तुम्ही त्याचे वॉलपेपर हनवू शकता. @shorterer.ig या इन्स्टाग्राम अकाउंटवर ही माहिती देण्यात आली आहे.
advertisement
5/5
हबलच्या प्रक्षेपणानंतर APOD ची सुरुवात झाली, जिथं दररोज एक नवीन स्पेस फोटो स्पष्टीकरणासह शेअर केला जातो. 2022 पासून, #NASABirthdayGift इन्स्टाग्रामवर ट्रेंड करत आहे, जिथं लोक त्यांचे फोटो शेअर करतात. पण अजूनही असे बरेच लोक आहेत ज्यांना याची माहिती नव्हती. तुम्हाला याबाबत माहिती होतं का? आणि नासाचं हे बर्थडे गिफ्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
तुमच्या Birthday ला NASA ही देतंय गिफ्ट, कसं आणि कुठे? पाहण्यासाठी पटापट लिंकवर करा क्लिक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल