इंग्रजीत वेळ सांगताना O'Clock म्हणतात, पण ओ क्लॉकचा अर्थ काय माहितीये?
- Published by:Priya Lad
Last Updated:
O' Clock meaning : किती वाजले असं विचारल्यावर, इंग्रजीत वेळ सांगायची तर आपण सहज वेळेचा आकडा सांगून त्यासमोर ओ क्लॉक असं लावतो. पण याचा अर्थ क्वचितच कुणाला माहिती असेल.
advertisement
1/5

किती वाजले असं विचारलं तर आपण मराठीत एक, दोन, तीन..., दीड, अडीच, साडेतीन, सव्वा, सव्वादोन, सव्वातीन, पाऊण, पावणेदोन, पावणेतीन असा वेळेचा आकडा सांगून पुढे वाजते असं म्हणतो. म्हणजे एक वाजला, दीड वाजले असं.... पण हीच वेळ इंग्रजीत सांगायची तर आपण वन ओ क्लॉक असं म्हणतो. पण याचा अर्थ काय माहिती आहे का?
advertisement
2/5
इंग्रजी वेळ सांगणं अगदी लहानपणापासून आपण शिकत आलो आहोत. आता मुलांनाही शिकवतो. पण ओ क्लॉकचा अर्थ काय आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? यातील क्लॉक म्हणजे घड्याळ पण ओ म्हणजे काय असतं? क्लॉकआधी ओ का लावला जातो? माहितीये?
advertisement
3/5
ओ क्लॉकचा अर्थ फार कमी लोकांना माहिती असावा. यातील ओ हे अक्षर अनेक अर्थांनी जोडलं गेलं होतं. यात शून्य, ओमेगा, ओइडा यांचा समावेश होतो. जो व्हिएनीजमध्ये वृद्ध व्यक्तीसाठी वापरला जातो. जेव्हा लोकांनी पहिल्यांदा वेळ सांगितली तेव्हा त्यांनी अनेक मार्ग वापरले..ज्यातून ओ क्लॉक शब्दाचा उगम झाला. घड्याळ हा त्यापैकी एक एक होता.
advertisement
4/5
बाराव्या शतकात जेव्हा घड्याळं नव्हती तेव्हा लोक वेळ सांगण्यासाठी अनेक मार्ग वापरत होते. सूर्याचा संदर्भ बिंदू म्हणून वापर केला जात असे. पण सूर्याचा वेळ घड्याळाच्या वेळेपेक्षा वेगळा आणि हंगामी होता. कोणीतरी सौर वेळेच्या विरुद्ध घड्याळाच्या वेळेबद्दल बोलत आहेत हे दर्शवण्यासाठी ओ क्लॉक वापरले जात असे.
advertisement
5/5
जर कोणी वेळ विचारली तर 9 ओ क्लॉक आहेत म्हणजे नऊ वाजले आहेत असं सांगितलं जात असे. गिझमोडोच्या मते अठराव्या शतकात ओ क्लॉकचा वापर अधिक गतिमान झाला जो आता अधिक टिकून आहे. आता आपण सूर्याच्या स्थितीनुसार वेळ सांगतो पण घड्याळावरील वेळेनुसार.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
इंग्रजीत वेळ सांगताना O'Clock म्हणतात, पण ओ क्लॉकचा अर्थ काय माहितीये?