Alcohol in Winter : थंडीत कोणती दारू प्यावी? रम, व्हिस्की का स्कॉच कोणता पर्याय बेस्ट, आजही अनेकांसाठी मोठा प्रश्न
- Published by:Devika Shinde
Last Updated:
थंडीत कोणती दारू प्यायली तर शरीराला ऊब मिळेल आणि नुकसानही होणार नाही? खरं तर, थंडीच्या दिवसांत शरीराचं तापमान कमी होतं आणि त्यामुळे आपल्याला गरम पदार्थ किंवा पेयाची गरज वाटते.
advertisement
1/8

दारु पिणं शरीरासाठी हानिकारक आहे. पण असं असलं तरी देखील अनेक लोक त्याचं सेवन करतात. कोणी मजा म्हणून तर कोणी सवय म्हणून, पण बहुतांश लोक आवर्जून दारु पितात. थंडीचा हंगाम आला की अनेकांच्या मनात एकच प्रश्न उभा राहतो. थंडीत कोणती दारू प्यायली तर शरीराला ऊब मिळेल आणि नुकसानही होणार नाही? खरं तर, थंडीच्या दिवसांत शरीराचं तापमान कमी होतं आणि त्यामुळे आपल्याला गरम पदार्थ किंवा पेयाची गरज वाटते. अशावेळी काही लोक ऊब मिळवण्यासाठी मद्यपान करतात. मात्र योग्य दारू, योग्य प्रमाण आणि योग्य पद्धत माहीत असणंही तेवढंच गरजेचं आहे.
advertisement
2/8
व्हिस्कीला सर्वात लोकप्रिय पर्याय काय?थंडीत सर्वाधिक पसंत केली जाणारी दारू म्हणजे व्हिस्की. हिच्यात अल्कोहोलचं प्रमाण जास्त असतं आणि ती शरीरात गेल्यानंतर लगेच उष्णता निर्माण करते. स्कॉच, सिंगल मॉल्ट किंवा ब्लेंडेड व्हिस्की हे प्रकार थंड हवामानात योग्य ठरतात. मात्र लक्षात ठेवा जास्त प्रमाणात घेतल्यास शरीरातील द्रव कमी होऊन उलट थंडी वाढू शकते.
advertisement
3/8
भारतात रमला थंडीतील सर्वात पारंपरिक दारू मानलं जातं. ओल्ड मॉंक किंवा डार्क रमसारखी पेये शरीरात उष्णता निर्माण करतात आणि रक्तप्रवाह सुधारतात. रममध्ये असलेले साखरयुक्त घटक शरीराला थंड हवेत ऊर्जा देतात. पण ती सुद्धा मर्यादित प्रमाणातच घ्यावी.
advertisement
4/8
पूर्वीच्या काळात ब्रँडीचा वापर सर्दी, खोकला किंवा ताप आल्यावर औषध म्हणून केला जायचा. तिचं तापमान शरीरात वाढवण्याचं गुणधर्म आजही मान्य आहे. एक चमचा ब्रँडी गरम पाण्यात किंवा मधासोबत घेतल्यास शरीराला तात्पुरती ऊब मिळते.
advertisement
5/8
ज्यांना स्ट्रॉंग दारू आवडत नाही त्यांच्यासाठी रेड वाइन हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यात अँटीऑक्सिडंट्स असतात जे हृदयासाठी चांगले असतात. थंड संध्याकाळी एका ग्लास रेड वाइनने रिलॅक्स वाटतं आणि शरीर उबदार राहतं.
advertisement
6/8
दारू शरीराला थोड्या वेळासाठी ऊब देऊ शकते, पण ती खरी उष्णता निर्माण करत नाही. उलट जास्त प्रमाणात घेतल्यास रक्तवाहिन्या फुगतात आणि शरीराचं तापमान बाहेर जातं. त्यामुळे थंडीत मर्यादित प्रमाणातच दारू घ्यावी आणि शरीर झाकून ठेवणं, गरम अन्न आणि पाणी घेणं हेच जास्त प्रभावी उपाय आहेत.
advertisement
7/8
थंडीत व्हिस्की, रम, ब्रँडी किंवा रेड वाइन हे पर्याय योग्य ठरू शकतात, पण फक्त मर्यादित प्रमाणात. कारण आरोग्य आणि सुरक्षितता हेच सर्वात महत्त्वाचं आहे.
advertisement
8/8
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी मद्यपानासाठी प्रोत्साहन देत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Alcohol in Winter : थंडीत कोणती दारू प्यावी? रम, व्हिस्की का स्कॉच कोणता पर्याय बेस्ट, आजही अनेकांसाठी मोठा प्रश्न