Shillong Missing Couple: सकाळी 10 वाजता सोनम मागे होती, राजा पुढे आणि सोबत ‘ते’ 3 अनोळखी चेहरे; टूरिस्ट गाईडच्या वक्तव्यामुळे कहाणीत ट्विस्ट
- Published by:Devika Shinde
Last Updated:
राजाचा मृतदेह 2 जूनला वेइसवडोंग धबधब्याजवळ एका दरीत आढळला. त्याच्या शेजारी मोठा चाकू होता. पोलिसांच्या मते यानेच त्याची हत्या झाली असावी.
advertisement
1/10

राजा आणि सोनम रघुवंशी हे दोघं 23 मे रोजी मेघालयातील शिलाँगहून बेपत्ता झाले. काही दिवसांनी राजाचा मृतदेह खाईत सापडला. पोलिसांना ही हत्या वाटतेय. सोनम अजूनही गायब आहे.
advertisement
2/10
सगळेच लोक राजाच्या हत्येमागे कोण आहे हे शोधण्यात व्यस्त आहेत, शिवाय सोनम कुठे गेली? याचा देखील शोध घेतला जात आहे. अशावेळी केसशी संबंधीत वेगवेगळ्या गोष्टी दिवसेंदिवस समोर येऊ लागला आहे. या गोष्टी थोड्याप्रमाणात केसच्या जवळ पोहोचायला मदत करतात, तर काही गोष्टी आणखी गुंतागुंत करुन ठेवत आहेत.
advertisement
3/10
अशीच एक माहिती अल्बर्ट पडे याने दिली. अल्बर्ट हा माव्लाखियात गावातील स्थानिक टूरिस्ट गाईड आहे. त्याने पत्रकारांना सांगितलं की त्याने राजा आणि सोनम यांना 3 अनोळखी पुरुषांसोबत पाहिलं होतं. (ai generated photo)
advertisement
4/10
22 मे रोजी या जोडप्याने शिलाँगहून स्कूटी भाड्याने घेतली आणि माव्लाखियात पोहोचले. ते डबल डेकर रूट ब्रिज पाहायला आले होते. रात्री ते शिप्रा होमस्टेमध्ये थांबले.
advertisement
5/10
पडे म्हणाला की दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 मे रोजी सकाळी 10 वाजता त्याने हे जोडपं पुन्हा पाहिलं. राजा काही पुरुषांशी हिंदीत बोलत होता. सोनम थोडी मागे चालत होती.
advertisement
6/10
राजाचा मृतदेह 2 जूनला वेइसवडोंग धबधब्याजवळ एका दरीत आढळला. त्याच्या शेजारी मोठा चाकू होता. पोलिसांच्या मते यानेच त्याची हत्या झाली असावी.
advertisement
7/10
गावातील लोक म्हणाले, “आम्ही अशा गुन्ह्यांचे प्रकार कधी पाहिले नाहीत. आम्ही देवाला घाबरतो. आता गावाची बदनामी होईल की काय, ही चिंता आहे.”
advertisement
8/10
पार्किंगमध्ये कुठलीच लॉगबुक नोंद व्यवस्थित ठेवलेली नव्हती. स्कूटी कुणाची होती, याची माहिती उशिरा मिळाली. परिसरात CCTV कॅमेऱ्यांची कमतरता ही मोठी अडचण ठरत आहे. ज्यामुळे ही केस सोडवायला विलंब होत आहे.
advertisement
9/10
23 मे रोजी या जोडप्यानं सकाळी 6 वाजता शिप्राहोमस्टेतून चेकआउट केलं. दुसऱ्या दिवशी रात्री स्कूटी सोहरा रिममध्ये सापडली. मात्र मृतदेह वेइसवडोंगमध्ये होता. हे अंतर आणि मधील वेळ संशयास्पद आहे.
advertisement
10/10
राजाची हत्या झाली हे स्पष्ट झालं असलं तरी सोनम कुठे आहे, याचं अजून उत्तर नाही. शिवाय राज ज्या तीन लोकांशी बोलत होता ते दोन लोक कोण होते? हा प्रश्न आता उपस्थीत झाला आहे. मेघालय पोलिसांनी तपास वेगाने सुरू ठेवला असून, प्रकरण अधिक खोल आहे का, याचा शोध घेत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Shillong Missing Couple: सकाळी 10 वाजता सोनम मागे होती, राजा पुढे आणि सोबत ‘ते’ 3 अनोळखी चेहरे; टूरिस्ट गाईडच्या वक्तव्यामुळे कहाणीत ट्विस्ट