TRENDING:

Snake facts - माणसापेक्षाही जास्त सापांची झोप! किती तासांची असते माहितीये? थंडीत तर कुंभकर्णासारखे झोपतात

Last Updated:
जगात असे अनेक प्राणी आहेत जे माणसांपेक्षा जास्त झोपतात. त्याचबरोबर झोपण्याच्या बाबतीत साप माणसांपेक्षा खूप पुढे आहेत. एवढंच नाही, तर थंडीच्या दिवसांत साप कुंभकर्णासारखी गाढ झोप घेतात. साप साधारणपणे किती तास झोपतात, हे तुम्हाला माहीत आहे का?
advertisement
1/7
माणसापेक्षाही जास्त सापांची झोप! किती तास माहितीये? थंडीत कुंभकर्णासारखे झोपतात
जगभरात प्राण्यांच्या लाखो प्रजाती आढळतात. त्यांच्यापैकी <a href="https://news18marathi.com/tag/snake-news/">साप</a> ही एक आहे. साप हा जगातला सर्वांत धोकादायक प्राणी मानला जातो. विषारी सापाने दंश केल्यावर तातडीने उपचार न झाल्यास संबंधित व्यक्ती जगण्याची शक्यता खूप कमी असते. जगभरात सापांच्या अनेक प्रजाती आहेत. त्याचप्रमाणे सापांबाबत अनेक रंजक गोष्टीही आहेत. या गोष्टींवर अनेकांचा विश्वास बसत नाही.
advertisement
2/7
सापांच्या सरपटण्याचा वेग आणि वयोमान याबाबत अनेक प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरं अनेकांना माहिती नाहीत. त्याचबरोबर साप किती वेळ झोपतात हादेखील असाच एक प्रश्न आहे. यातही आळशी समजले जाणारे अजगर एका दिवसात किती तास झोपतात या प्रश्नाचं उत्तरही बहुतांश जणांना माहिती नाही.
advertisement
3/7
मिळालेल्या माहितीनुसार, झोपेच्या बाबतीत साप माणसांपेक्षा खूप पुढे आहेत. साप एक दिवस म्हणजेच 24 तासांपैकी 16 तास झोपतात. त्याच वेळी आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात आढळणारा अजगर हा महाकाय साप एका दिवसात 18 तासांची दीर्घ झोप घेतो.
advertisement
4/7
हिवाळ्यात बहुतेकसे साप बिळामध्ये लपून बसतात. या कालावधीत ते बराच काळ झोपून असतात. थंडीच्या दिवसांत साप 20 ते 22 तास झोपतात, असं म्हटलं जातं. हिवाळ्यात महाकाय अजगर एकदाच मोठी शिकार करतो आणि बरेच दिवस झोपून राहतो.
advertisement
5/7
अजगराचं वजन 250 पौंड आणि त्याची लांबी 22 फुटांपर्यंत असू शकते. अ‍ॅनाकोंडा हा जगातला सर्वांत मोठा साप मानला जातो. तो दक्षिण अमेरिकेत आढळतो. त्याची लांबी 44 फुटांपर्यंत तर वजन 70 ते 150 किलोपर्यंत असतं. मोठ्या आकारामुळे या अजगराला एका वेळी जास्त अन्न लागतं.
advertisement
6/7
सापांना उग्र वासाची जास्त भीती वाटते. आलं, लसूण आणि फिनाइलचा वास असलेल्या ठिकाणांपासून साप दूर राहतात. प्रखर प्रकाशामुळे त्यांच्या दृष्टीच्या क्षमतेवर परिणाम होतो. कधी कधी प्रखर प्रकाशामुळे साप आंधळे होतात. अशा स्थितीत त्यांना याचीही भीती वाटते. तापमानात अचानक वाढ झाल्यानेदेखील साप घाबरतात.
advertisement
7/7
सापाचं विष जहाल असतं. त्याचबरोबर त्यांच्या हालचालीही खूप वेगवान असतात. किंग कोब्रा हा जगातल्या सर्वांत वेगानं सरपटणाऱ्या सापांपैकी एक मानला जातो. त्याचा वेग 3.33 मीटर प्रति सेकंद एवढा असतो. तसंच किंग कोब्राचं आयुर्मान इतर सापांपेक्षा जास्त असतं. बहुतेकसे किंग कोब्रा 20 वर्षं जगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Snake facts - माणसापेक्षाही जास्त सापांची झोप! किती तासांची असते माहितीये? थंडीत तर कुंभकर्णासारखे झोपतात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल