सुंदर आणि निरागस दिसतात पण खूपच खतरनाक आहेत हे प्राणी!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
जगभरात अनेक निरनिराळे प्राणी असतात. यामध्ये अनेक प्राणी धोकादायक आणि खतरनाक असतात. मात्र असेही काही प्राणी असतात जे फक्त दिसायला निरागस असतात मात्र प्रत्यक्षात ते खूप धोकादायक असतात.
advertisement
1/8

जगभरात अनेक निरनिराळे प्राणी असतात. यामध्ये अनेक प्राणी धोकादायक आणि खतरनाक असतात. मात्र असेही काही प्राणी असतात जे फक्त दिसायला निरागस असतात मात्र प्रत्यक्षात ते खूप धोकादायक असतात.
advertisement
2/8
न्यू गुएनाचा ल किन हुडेड पिटोहुई पक्षी दिसायला सुंदर आहे. मात्र हैराण करणारी गोष्ट म्हणजे हा मधूर आवाजाचा पक्षी खूप धोकादायक आहे. त्याची त्वचा आणि पंख न्युरोटॉक्सिनने बनलेले आहेत. ज्याला स्पर्श करणंही खूप धोकादायक आहे.
advertisement
3/8
गाका नावाचा कॅसोवरी दुरून पाहिल्यावर अनेक प्रकारच्या पक्ष्यांसारखा दिसतो. हे टर्की आणि शहामृगाचे मिश्रण असल्याचं दिसतं आणि चेहऱ्यावरून तो मोरासारखे दिसतो. मात्र त्याच्या अंगावर काळे पिसे आहेत. हा सुंदर दिसणारा प्राणी जेव्हा हल्ला करतो तेव्हा तो खूप धोकादायक बनतो. जर तुम्ही चुकूनही त्रास दिला तर तो तुमच्या मागे येऊ शकतो.
advertisement
4/8
केसाळ आणि सुंदर दिसणारा ग्रेट अँटिटर दक्षिण आणि मध्य अमेरिकेत आढळतो. हा मोठा प्राणी मुंग्या आणि दीमक खातो. तो नामशेष होण्याचा मार्गावर आहे. पण तरीही ते स्वतःचे रक्षण करताना आपले शक्तिशाली पंजे वापरतात आणि ते खूप खतरनाक असतात.
advertisement
5/8
समुद्रात आढळणारा निळा अजगर फक्त 3 सेमी आकाराचा आहे. बरेच लोक याला सी एंजल देखील म्हणतात. त्याच्या निळ्या शरीरातील चमकदार चांदीच्या रंगाचे भाग लोकांचे लक्ष वेधून घेतात. सुंदर दिसत असूनही, ते स्वसंरक्षणार्थ विषारी चिकट पदार्थ सोडतात. हे अत्यंत घातक विष आहे.
advertisement
6/8
डिंगे कुत्रे दिसायला निरागस असतात मात्र तेही खूप भयानक असतात. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आशियातील मोठे शिकारी प्राणी आहेत. लोकांना सहसा लाजाळू आणि शांत कुत्रे आढळतात. मात्र डिंगे कुत्र्याला राग आल्यावर मग तो कोणालाही इजा पोहोचवू शकतो.
advertisement
7/8
हेजहॉग एक काटेरी जंगली उंदीर आहे. जे स्वतःला बॉलमध्ये फिरवू शकतो. त्याच्या लूकमुळे ते अधिक आकर्षक दिसतात. पण त्यांच्या अंगावरचे काटे त्यांना अतिशय धोकादायक बनवतात. ते हातात उचलता येत नाही.
advertisement
8/8
पॉयजन डार्ट बेडूक नावावरूनच हे दिसतं की तो किती धोकादायक प्राणी असू शकतो. तो दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक आहे. मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील बेडूक लहान आणि अतिशय तेजस्वी रंगाचे आहे. मात्र त्यांच्या त्वचेत घातक विष असतं.