हा साप 1 वॉर्निंग देतो, मगच वचपा काढतो; 'असा' आवाज आला रे आला की पळ काढायचा!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Russel Viper: पावसाळ्यात साथीचे आजार जसे झपाट्याने पसरतात, तसाच विषारी प्राण्यांचा धोकाही मोठा असतो. या काळात सर्पदंशाच्या घटना वारंवार समोर येतात. विशेषतः जंगलांशेजारील गावांना सापांचा धोका मोठा असतो. काही साप एवढे डेंजर असतात की, त्यांच्या डसण्यानं थेट मृत्यू होऊ शकतो. (मृत्यूंजय बघेल, प्रतिनिधी)
advertisement
1/5

वन्यजीव विशेषज्ज्ञ डॉ. आशिष त्रिपाठी सांगतात, भारतात 4 प्रजातीचे साप प्रचंड विषारी असतात. रसेल व्हायपर त्यापैकीच एक. या सापाच्या शरिरावर गोलाकार खुणा असतात.
advertisement
2/5
रसेल व्हायपरचे दात खूप मोठे आणि टोकदार असतात. जवळपास 15 मिलीमीटर लांब 1 दात असतो. या दातांनी तो बूटसुद्धा सहज फाडू शकतो. हा साप दक्षिण आशिया आणि पूर्व आशिया खंडात आढळतो.
advertisement
3/5
आशिष यांनी सांगितलं की, या सापाचं डोकं त्रिकोणी आणि शरीर जाड असतं. रंग भूरकट पिवळा, मातेरी असतो. त्याचं विष एवढं खतरनाक असतं की, त्यामुळे मानवी शरिरात रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात.
advertisement
4/5
हा साप चावल्यास सूज येते, तो भाग असह्य दुखतो, चक्कर येते, श्वास घ्यायला त्रास होतो, हृदयाची धडधड वाढते. ताबडतोब उपचार मिळाले नाही तर व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.
advertisement
5/5
त्यामुळे जर हा <a href="https://news18marathi.com/photogallery/national/dont-panic-if-you-suddenly-come-across-a-snake-these-things-should-be-done-calmly-gh-mhrp-1231676.html">साप दिसला तर</a> शक्य तेवढं त्याच्यापासून लांब राहा, <a href="https://news18marathi.com/photogallery/viral/ajab-gajab-angry-boy-bite-snake-hood-reason-will-shocked-you-mhds-1233462.html">अजिबात त्याला त्रास देऊ नका</a> आणि तातडीनं सर्पमित्रांना माहिती द्या. हा <a href="https://news18marathi.com/viral/why-snakes-flick-tongue-continues-know-scientific-reason-behind-it-mhds-1232580.html">साप</a> माणसांच्या जवळ आल्यास कुकरच्या शिट्टीसारखा मोठा आवाज काढतो. ती आपल्यासाठी वॉर्निंग व्हिसल असते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
हा साप 1 वॉर्निंग देतो, मगच वचपा काढतो; 'असा' आवाज आला रे आला की पळ काढायचा!