'वेळ अमावस्या' अनेकांच्या आवडीचा सण, चूक नाही बरोबर वाचलंत; महाराष्ट्रातच साजरा होतो, कुठे-करतात काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Vel Amavasya : तुम्ही आजवर कोजागिरी पौर्णिमा साजरी केली असेल. पण महाराष्ट्रातीलच एक असा भाग जिथं अमावस्याही सणासारखी साजरी केली जाते. यादिवशी नेमकं करतात काय?
advertisement
1/5

सामान्यपणे कोणताही सण म्हटला की पौर्णिमेसारख्या शुभ दिवशी येतो. अमावस्या तशी अशुभ मानली जाते. म्हणजे अमावस्या म्हटलं की अनेकांना भीती वाटते. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही, महाराष्ट्राचा एक भाग जिथं अमावस्या सणासारखी साजरी केली, ही वेळ अमावस्या.
advertisement
2/5
वेळ अमावस्या ज्याला येळवस असंही म्हणतात. मार्गशीर्ष महिन्यात पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या. आनंदाची, मातीची माणसांची असते. कर्नाटकातील हा सण महाराष्ट्राच्या सीमाभागात आला आहे. लातूर धाराशीव आणि सोलापूर जिल्ह्यातील काही भागामध्ये वेळ अमावस्या म्हणजे सण जो उत्साहात साजरा केला जातो
advertisement
3/5
आदल्या रात्री वेळ अमावस्येची सुरुवात होते. तेव्हा भाकरी केली जाते पण ही भाकरी नाही तर रोडगे असतात सामान्य भाकरीपेक्षा थोडी जाड असते. याशिवाय भजी, गव्हाची खीर, ज्वारी आणि भाकरीची उंडे, तिळाची पोळी धपाटे, वांग्याचं भरीत आणि ज्वारीचं पीठ रात्रभर ताकात बुडवून ठेवलेलं आंबिल बनवलं जातं.
advertisement
4/5
खरा सण सुरू होतो सकाळी. सगळं सामान बांधून मडक्यात थंडगार आंबिल घेऊन सगळे शेताकडे निघतात एका झाडाखाली ईशान्य दिशेला 5 पांडव मांडले जातात प्रत्येक जण आपल्या शेतात एक खोपटी बांधतात त्याभोवती एक लाल किंवा गुलाबी शाल घालतात. लक्ष्मीची पूजा करून नारळ फोडतात.
advertisement
5/5
पूजा झाली की लगेच पंगत बसते. शेजारी, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, अगदी रस्त्याने जाणारी अनोळखी व्यक्तीही या पंगतीला बसते. ज्याच्याकडे शेत आहे ते आपल्या शेतात आणि ज्यांच्याकडे शेत नाही ते दुसऱ्यांच्या शेतात जेवायला बसतात. (सर्व फोटो : सोशल मीडिया)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
'वेळ अमावस्या' अनेकांच्या आवडीचा सण, चूक नाही बरोबर वाचलंत; महाराष्ट्रातच साजरा होतो, कुठे-करतात काय?