Wedding Story : लग्नात नवरा नवरीला मंगळसूत्र उलटं का घालतो? मुलीच्या वयाशी संबंध
- Published by:Priya Lad
Last Updated:
Wedding Mangalsutra Tradition : लग्नात नवरा नवरीला मंगळसूत्र घालतो पण ते उलटं, हे सगळ्यांना माहिती आहे. पण त्यामागील कारण काय, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?
advertisement
1/6

हिंदू धर्मातील विवाह संस्कृतीत लग्नानंतर मंगळसूत्र खूप महत्त्वाचं आहे. मंगळसूत्राला सौभाग्याची खूण मानलं जातं. लग्नात नवरदेव नवरीला देवा-ब्राह्मणाच्या साक्षीने मंगळसूत्र घालतो. ज्यानंतर महिला ते आपल्या गळ्यातच ठेवतात. मंगळसूत्र हा फक्त दागिना नसून भारतीय स्त्रीसाठी ते तिचं स्त्रीधन असतं. ते तिच्या सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं.
advertisement
2/6
एका धाग्यात काळे मणी आणि सोनं अशी मंगळसूत्राची रचना असते. मंगळसूत्रामध्ये नऊ मणी असतात, जे दुर्गा देवीच्या नऊ रूपांचं प्रतीक मानले जातात. काळ्या मण्यांमध्ये अशुभ ऊर्जा महिलेपासून आणि तिच्या सौभाग्यापासून दूर ठेवण्याची ताकद असते. तर सोनं गुरु ग्रहाचं प्रतीक मानलं जातं. सोन्यामुळे शरीर शुद्ध होतं.
advertisement
3/6
असं मानलं जातं की, मंगळसूत्र पतीचं रक्षण करतं, मंगळसूत्र घातल्याने पतीचं आयुष्य वाढतं, वैवाहिक जीवन आनंदी आणि सुरक्षित राहतं, वैवाहिक जीवनात कोणतीही समस्या येत नाही. शिवाय मंगळसूत्रामुळे संसारावर असणाऱ्या लोकांच्या वाईट नजरा दूर राहतात आणि नवरा-बायकोमध्ये प्रेमाची भावना वाढते, अशी मान्यता आहे.
advertisement
4/6
लग्नात एक गोष्टी तुम्ही पाहिली असेल की नवरीला उलटं मंगळसूत्र घातलं जातं, यामागे एक खास इतिहास आहे. ज्याचा संबंध मुलींच्या वयासी आहे.
advertisement
5/6
पूर्वी मुलींची लग्न लवकर व्हायची. लग्न झाल्यावर मुलींना वयात येण्यासाठी काळ बाकी असायचा. या वयाच्या काळात मुलगी आई होण्यासाठी परिपक्व नाही याची जाणीव करून देण्यासाठी लग्नात मंगळसूत्र उलटं घालायचे आणि वयात आल्यावर ते सरळ केलं जायचं.
advertisement
6/6
कालांतराने मुलींची लग्न योग्य वयात होऊ लागली. पण काही दिवस मंगळसूत्र उलटं ठेवण्याची प्रथा कामय राहिली. मुलीचं नुकतंच लग्न झालं आहे हे लोकांना समजण्यासाठी आजही मंगळसूत्र उलटं घालण्याची प्रथा सुरूच आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Wedding Story : लग्नात नवरा नवरीला मंगळसूत्र उलटं का घालतो? मुलीच्या वयाशी संबंध