TRENDING:

मृत्यूनंतर 24 तासांत काय घडतं? स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी सांगितलं भयानक सत्य; वाचूनच थरकाप उडेल

Last Updated:
What Happend After Death : मृत्यूला सर्वात जवळून पाहतात. ते म्हणजे स्मशानभूमीतील कामगार. मृत्यूनंतर काय होतं, याबाबत स्मशानातील  कामगारांनी उघड केलेलं सत्य धक्कादायक आहे.
advertisement
1/7
मृत्यूनंतर 24तासात काय होतं? स्मशानातील कर्मचाऱ्यांनी सांगितलं, ते थरकाप उडवणारं
मृत्यूनंतर काय होतं? असा प्रश्न बहुतेकांना पडतो. मृत्यूनंतरही जग आहे असं म्हणतात. काही लोक मृत्यूनंतर जिवंत झालो, आपण मृत्यूनंतरचं जग पाहिलं असा दावा करतात. यावर कितपण विश्वास ठेवायचा ते सांगू शकत नाही. पण काही लोक असे आहेत जे मृत्यूला सर्वात जवळून पाहतात. ते म्हणजे स्मशानभूमीतील कामगार. मृत्यूनंतर काय होतं, याबाबत स्मशानातील  कामगारांनी उघड केलेलं सत्य धक्कादायक आहे.
advertisement
2/7
स्मशानातील कामगार  दररोज असंख्य मृतदेह जाळताना पाहतात. म्हणूनच मृत्यूनंतर मृतदेहाचे काय होतं हे त्यांना चांगलं माहिती आहे. मृत्यूनंतर काय होतं, याबाबत स्मशानातील  कामगारांनी जे सांगितलं ते वाचूनच तुम्ही थरथर कापाल.
advertisement
3/7
त्यांनी सांगितल्यानुसार 2-6 तासांनी रिगोर मॉर्टिस सुरू होतं. सुरुवातीला शरीर कडक होऊ लागतं. हात आणि पाय सरळ होतात. तोंड उघडं राहतं. असं वाटतं जणू मृतदेह ओरडत आहे.
advertisement
4/7
6-12 तासांनंतरचा क्षण तर  सर्वात भयावह आहे. शरीरातील उरलेले वायू आणि स्नायू अचानक आकुंचन पावतात. अचानक मृतदेहाचं धड वर येतं, हात पुढे सरकतात, कधीकधी डोळे देखील उघडतात. हे पाहून, नवीन कर्मचारी पळून जातो.
advertisement
5/7
जेव्हा मृतदेह चितेवर ठेवला जातो आणि अग्नी लावला जातो तेव्हा शरीरातील पाणी वाफेत बदलतं. या वाफेमुळे स्नायू फुगतात, हातपाय हालतात. असं दिसतं की जणू प्रेत जिवंत झालं आहे. कधीकधी शरीर उलटंदेखील होतं.
advertisement
6/7
सर्वात भयानक आवाज म्हणजे कवटीचा स्फोट होण्याचा आवाज. जेव्हा मेंदूतील पाणी 100 अंशांवर उकळतं तेव्हा कवटीच्या आत दाब वाढतो. अचानक मोठ्या आवाजात कवटीचा स्फोट होतो. रात्रीच्या शांततेत हा आवाज दूरवर घुमतो.
advertisement
7/7
अनेकदा आग लागल्यावर पोटात अडकलेला वायू तोंडातून बाहेर पडतो. हवेच्या दाबामुळे आआआआआआ... असा आवाज निर्माण होतो. जो कोणी पहिल्यांदाच हे ऐकतो त्याची रात्रीची झोप उडू शकते. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
मृत्यूनंतर 24 तासांत काय घडतं? स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी सांगितलं भयानक सत्य; वाचूनच थरकाप उडेल
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल