Couple Marriage Age Gap : पती-पत्नीच्या वयात अंतर हवं, पण समान वय असलेल्या कपलने लग्न केलं तर काय होतं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Couple Age Gap Marriage : सामान्यपणे पती पत्नीपेक्षा मोठा असावा असं म्हणतात. पण असे काही कपल्स ज्यात पत्नी पतीपेक्षा मोठी आहे किंवा दोघांच्या वयात खूपच अंतर आहे. पण दोघंही ना एकमेकांपेक्षा मोठे, ना लहान असतील. त्यांचं वय सारखं असेल तर त्याचा काय परिणाम होतो?
advertisement
1/7

पती-पत्नीच्या वयात फरक असावा असं सांगितलं जातं. सामान्यपणे भारतात पती पत्नीपेक्षा मोठा, असंच आधीपासून चालत आलं आहे. अजूनही अरेंज मॅरेजमध्ये याचं पालन केलं जातं. पण लव्ह मॅरेजमध्ये मात्र कपल वय पाहत नाही. कित्येक कपल्समध्ये पती पत्नीपेक्षा लहान आहे किंवा दोघांच्या वयात खूपच अंतर आहे. त्याचे परिणामही वेगवेगळे आहेत. पण पती किंवा पत्नी, दोघंही एकमेकांपेक्षा लहान नाही आणि मोठेही नाही. दोघांचंही वय सारखंच असेल तर मग काय होतं?
advertisement
2/7
प्रत्यक्षात वैज्ञानिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हे पूर्णपणे नॉर्मल आणि अनेकदा फायदेशीरही ठरू शकतं.
advertisement
3/7
आरोग्याच्या दृष्टीने म्हणाल तर कोणताही मेडिकल प्रॉब्लेम होत नाही. लग्नासाठी किंवा संततीसाठी समान वय ही अडचण नाही. स्त्री-पुरुषांचे जैविक वय वेगळ्या गतीने बदलतं, पण वय समान असल्यामुळे कोणताही आजार होत नाही. गर्भधारणेच्या बाबतीत स्त्रीचं वय जास्त महत्त्वाचं असतं, पुरुषाचं नाही. दोघंही 20s–30s मध्ये असतील तर हेल्थ रिस्क कमीच असतो. सारखं वय असलं तर मुलं होत नाहीत, हा पूर्णपणे गैरसमज आहे.
advertisement
4/7
मानसिक आणि भावनिक परिणाम हा भाग सर्वात जास्त पॉझिटिव्ह ठरतो. समान वय म्हणजे आयुष्याचा समान टप्पा. करिअरची स्टेज, जबाबदाऱ्या, विचार करण्याची पद्धत, मित्रमंडळी, संस्कृती, ट्रेंड्स सगळं सारखं. यामुळे एकमेकांना समजून घेणं सोपं जातं, एगो क्लॅश कमी होतो, निर्णय सामूहिक घेतले जातात. मी मोठा आहे किंवा मी मोठी आहे असं अहंकार राहत नाही.
advertisement
5/7
सारखं वय असणाऱ्या कपल्समध्ये Dominance कमी असतो, Mutual respect जास्त असतो, निर्णयांमध्ये दोघांचं समान मत असतं. आर्थिक आणि घरगुती जबाबदाऱ्या अधिक बॅलन्स होतात आजच्या काळात ही गोष्ट खूप महत्त्वाची मानली जाते.
advertisement
6/7
पण सगळं परफेक्टच असेल असं नाही: दोघंही immature असतील तर भांडणं वाढू शकतात, दोघांनाही लीडरशीप घ्यायची नसेल तर निर्णय लांबू शकतात. जर दोघं एकाच वेळी करिअरला सुरुवात करत असतील आर्थिक स्थैर्य उशिरा येऊ शकतं. पण हे वयामुळे नाही, स्वभावामुळे होतं. वयापेक्षा महत्त्वाचं आहे. विचारांची जुळवाजुळव, संवाद, एकमेकांचा आदर, जबाबदारी स्वीकारण्याची तयारी, संकटात एकत्र उभं राहणं.
advertisement
7/7
सारखं वय असलेल्या कपल्सनी लग्न केलं तर काहीही वाईट होत नाही. उलट समज वाढते, नात्यात समता येते, आधुनिक आयुष्यासाठी हे मॉडेल खूप सूट होतं जर दोघं मानसिकदृष्ट्या mature, जबाबदार आणि एकमेकांना समजून घेणारे असतील तर वयाचा फरक हा फक्त आकडा ठरतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Couple Marriage Age Gap : पती-पत्नीच्या वयात अंतर हवं, पण समान वय असलेल्या कपलने लग्न केलं तर काय होतं?