Whiskey : डबल आणि सिंगल मॉल्ट व्हिस्कीमध्ये काय फरक? कोणती स्वस्त किंवा महाग
- Published by:Devika Shinde
Last Updated:
बाजारात सिंगल मॉल्ट आणि डबल मॉल्ट व्हिस्की मिळते. अनेकांना हे ऐकून माहित आहे. पण या दोन्ही व्हस्किमधील नेमका फरक काय? हे अनेकांना माहित नाही.
advertisement
1/7

जगभरात व्हिस्की हा एक लोकप्रिय ड्रिंक मानला जातो. भारतीयांचे बहुतांश कार्यक्रम हे दारुशिवाय पूर्णच होत नाहीत. मग ती ऑफिसमधली पार्टिअसोत किंवा लग्नसमारंभ. दारु हल्ली सगळ्याच कार्यक्रमात दिसते. तर काही खास प्रसंगी व्हिस्कीचे नाव हमखास घेतले जाते. बाजारात सिंगल मॉल्ट आणि डबल मॉल्ट व्हिस्की मिळते. अनेकांना हे ऐकून माहित आहे. पण या दोन्ही व्हस्किमधील नेमका फरक काय? हे अनेकांना माहित नाही.
advertisement
2/7
व्हिस्की प्रामुख्याने जव या धान्यापासून तयार केली जाते. पण ती बनवण्याची सगळ्यात महत्वाची प्रक्रिया म्हणजे मॉल्टिंग. यामध्ये जवला अंकुरवून त्याचा मॉल्ट तयार केला जातो. आता या मॉल्टवरूनच व्हिस्कीचे प्रकार ठरतात.
advertisement
3/7
सिंगल मॉल्ट व्हिस्की म्हणजे काय?हा प्रकार फक्त एका डिस्टिलरीत तयार होतो आणि त्यात केवळ मॉल्टेड जवचाच वापर केला जातो. दुसऱ्या कुठल्याही ठिकाणची मॉल्ट मिसळली जात नाही. त्यामुळे तिचा स्वाद आणि सुगंध त्या ठिकाणाच्या उत्पादन पद्धतीवरच अवलंबून असतो.
advertisement
4/7
Glenfiddich आणि Macallan या अशाच प्रकारच्या प्रसिद्ध सिंगल मॉल्ट व्हिस्की आहेत.
advertisement
5/7
डबल मॉल्ट व्हिस्की म्हणजे काय?प्रत्यक्षात याला उद्योगात ब्लेंडेड मॉल्ट व्हिस्की असेही म्हटले जाते. यात दोन किंवा अधिक डिस्टिलरींच्या मॉल्ट व्हिस्कींचे मिश्रण केले जाते. त्यामुळे तिचा स्वाद अधिक संतुलित, मऊसर आणि कधीकधी थोडा वेगळाच असा असतो.
advertisement
6/7
सिंगल मॉल्ट प्रीमियम आणि किंमतीत जास्त असते, तर डबल किंवा ब्लेंडेड मॉल्ट तुलनेत अधिक परवडणारी आणि सर्वसामान्य चवीला साजेशी असते.
advertisement
7/7
सिंगल मॉल्ट म्हणजे एका ठिकाणी बनलेली शुद्ध मॉल्ट व्हिस्की आणि डबल मॉल्ट म्हणजे दोन किंवा अधिक मॉल्ट व्हिस्कींचा संगम.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Whiskey : डबल आणि सिंगल मॉल्ट व्हिस्कीमध्ये काय फरक? कोणती स्वस्त किंवा महाग