Snake : घरी साप शिरला तर त्याला मारु नका, फक्त हे काम करा, स्वत:च जाईल पळून
- Published by:Devika Shinde
Last Updated:
हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की आपण जितके सापाला घाबरतो, तितकेच साप देखील आपल्याला घाबरतात. आपल्यामुळे त्यांना जीवाला धोका आहे असं वाटलं तरच साप आपल्याला चावतात. नाहीतर ते पळ काढतात.
advertisement
1/7

भारतात सापाला देव मानलं जातं. आपल्या देशात सापांची पूजा केली जाते. पण असं असलं तरी लोक सापाचं नुसतं नाव जरी घेतलं तरी घाबरतात. बरेच लोक सापांनाही घाबरतात पण येथे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की आपण जितके सापाला घाबरतो, तितकेच साप देखील आपल्याला घाबरतात. आपल्यामुळे त्यांना जीवाला धोका आहे असं वाटलं तरच साप आपल्याला चावतात. नाहीतर ते पळ काढतात.
advertisement
2/7
पण तरीही कधीकधी साप एखाद्याच्या घरात शिरला तर नक्कीच कोणालाही भीती वाटणारच. ज्यामुळे लोक पॅनिक होतात आणि आरडाओरडा करतात. काही लोक सापाला मारायला जातात. त्यामुळे साप आक्रमक होतो आणि चावतो. पण अशावेळी घाबरुन न जाता किंवा जास्त आरडाओरडा न करता शांत राहण्याची गरज आहे.
advertisement
3/7
आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्यांचा वास घेतल्यावर साप पळून जातात. या अशा वस्तु आहेत ज्या तुमच्या स्वयंपाकघरात तुम्हाला आरामात मिळतील.
advertisement
4/7
प्राणीशास्त्र विभागाचे तज्ज्ञ डॉ. अनिल कुमार म्हणाले की, भारतात फक्त 20 टक्के विषारी साप आढळतात. साप कधीही माणसांना चावण्याच्या मनःस्थितीत नसतात, जेव्हा त्यांना धोका वाटतो तेव्हाच ते आपला जीव वाचवण्यासाठी हल्ला करतात.
advertisement
5/7
डॉ. अनिल कुमार म्हणाले की, जर घरात साप शिरला तर त्याला एकटे सोडले पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल की साप तुमच्यासाठी धोकादायक असलेल्या क्षेत्रात शिरला आहे, तर तुम्ही सर्प मित्राशी संपर्क साधू शकता.
advertisement
6/7
पृथ्वीवर कोणत्याही सापाला कान नसतात, पण साप मोठ्या आवाजाला खूप घाबरतात. त्यांच्या शारीरिक रचनेमुळे ते ध्वनींचा आवाज ओळखतात. एका संशोधनानुसार, ही शरीर रचना त्यांना भक्षकांपासून पळून जाण्यास मदत करते. त्यामुळे, जर सापाभोवती अचानक मोठा आवाज आला तर तो आपोआप सुरक्षित ठिकाणाकडे पळू लागतो.
advertisement
7/7
याशिवाय, सापांना तीव्र वासाचा त्रास होतो, म्हणून जर घरात साप शिरला तर तिथे फिनाईल, व्हिनेगर किंवा रॉकेल शिंपडा. यासोबत लसूण, लिंबू, दालचिनी आणि पुदिना देखील तुम्ही टाकू शकता, त्याच्या वासाने साप पळून जातात. त्याचप्रमाणे, सापांना तापमानातील बदलांची भीती वाटते. यामुळेच घरात लपलेल्या सापाला धुराच्या मदतीने हाकलून लावले जाऊ शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Snake : घरी साप शिरला तर त्याला मारु नका, फक्त हे काम करा, स्वत:च जाईल पळून