viral news :...जर पृथ्वीवरील एखाद्या शहरावर लघुग्रह आदळला तर काय होईल?
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
लघुग्रह आदळल्यास समुद्राच्या लाटांवर परिणाम होतो. त्यामुळे विवर तयार होऊ शकते. धक्के, तीव्र वारा आणि भूकंप येऊ शकतो.
advertisement
1/8

एखादा लघुग्रह पृथ्वीवर किंवा तुम्ही राहत असलेल्या शहरावर येऊन आदळला तर? या प्रश्नाने कदाचित तुम्ही घाबरून जाल. अर्थातच ही भीतिदायक बाब आहे; पण 'नासा'ने या संदर्भात बऱ्याच शक्यतांचा गांभीर्यपूर्वक विचार केलेला आहे. अशा प्रकारच्या लघुग्रहाच्या अपघातांपासून आपला बचाव होऊ शकतो की नाही, याची चाचपणी 'नासा'ने यापू्र्वीच केली आहे. अशा संभाव्य घटनांबाबत नेमक्या कोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत, ते सविस्तर जाणून घेऊ या.
advertisement
2/8
2022मध्ये मानवाने अंतराळात यान पाठवून लघुग्रहाचा वेध घेण्याचा पहिला प्रयत्न केला. नासाच्या या डार्ट मिशनमध्ये आपण पृथ्वीचा वैश्विक अपघातापासून बचाव करू शकतो की नाही याची चाचपणी केली गेली. दररोज सूर्यमालेचा मागोवा घेत ती ओलांडणाऱ्या लाखो लघुग्रहांचं सर्वेक्षण केलं जातं. यापैकी कोणता लघुग्रह पृथ्वीवर धडकू शकतो याचं बारकाईने निरीक्षण केलं जातं, `द डेली डायजेस्ट`ने याविषयीची माहिती दिली आहे.
advertisement
3/8
नील अग्रवाल यांनी त्यांच्या Neal.fun या वेबसाइटवर लघुग्रह सिम्युलेटरवर अनेक स्थितींची निर्मिती केली आहे. जगात कुठेही लघुग्रह आदळला तर त्याचे काय परिणाम होतील हे यावरून कळतं. या सिम्युलेटरवर लोह, दगड, सोनं, कार्बन किंवा धूमकेतूपासून बनलेल्या लघुग्रहाचे विविध प्रकार तुम्ही निवडू शकता. त्याचा व्यास तीन फूट आणि एक मैल दरम्यान प्रोग्राम करू शकता. यात 1.000 mph ते 250.000 mph किंवा प्रभावाच्या कोनापर्यंतचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. शेवटी लघुग्रह लाँच करण्यासाठी युझरला नकाशावर फक्त एक बिंदू निवडावा लागतो. सिम्युलेटर नंतर विवराच्या आकारापासून ते परिणामी होणाऱ्या भूकंपाच्या तीव्रतेपर्यंतचे अनेक भिन्न परिणाम दर्शवतो. हे सिम्युलेशन डॉ. गॅरेथ कॉलिन्स आणि डॉ. क्लेमेन्स रम्फ यांच्या संशोधनावर आधारित आहे.
advertisement
4/8
एखाद्या शहरावर लघुग्रह आदळला तर कशी स्थिती निर्माण होईल, याचं प्रात्यक्षिक पाहण्यासाठी सिम्युलेटरने 250.000mph वेगाने गोल्ड लघुग्रह सोडला. या आकाराचा लघुग्रह न्यूयॉर्क शहरावर आदळला तर 13 दशलक्षाहून अधिक नागरिक विवरात नष्ट होतील. लाखो लोकांचा मृत्यू होईल. याचा धक्का दक्षिणेला डोमिनिक रिपब्लिक, पश्चिमेला डल्लास आणि उत्तरेला हडसन बे पर्यंत (कॅनडा) जाणवेल.
advertisement
5/8
केनियात नैरोबी येथे लघुग्रह आदळल्यास जवळपास संपूर्ण पूर्व आफ्रिका नष्ट होईल. याच्या धक्क्याने 27 दशलक्षाहून अधिक लोकांचा मृत्यू होईल. सुमारे तीन दशलक्ष लोकांची विवरात वाफ होईल. अशा प्रकारच्या लघुग्रहामुळे माद्रिदमध्ये 9.7 अंशाचा भूकंप होईल. तो 473 मैलांपेक्षा जास्त अंतरावर जाणवेल. यामुळे संपूर्ण पोर्तुगाल आणि आफ्रिकेच्या उत्तरेकडील भाग प्रभावित होईल. पॅरिसमध्ये लघुग्रहाचा परिणाम मोठा जाणवेल. याचा परिणाम पोलंड, यूके आणि इटलीसह डझनभर युरोपीय देशांमध्ये होईल.
advertisement
6/8
हाँगकाँगमध्ये 16,149 मैल प्रतितास वेगाने वारे वाहतील. यामुळे 250 दशलक्षहून अधिक लोक मारले जातील. तसंच याचा परिणाम म्यानमार, थायलंड, मलेशिया आणि फिलिपिन्सवर होईल. लघुग्रह टोकियोच्या उपसागराला जवळ आदळला तर जपान आगीच्या गोळ्याखाली पूर्णपणे गायब होईल. या विवरामुळे 1.1 मैल उंचीच्या त्सुनामी येऊ शकते.
advertisement
7/8
टोरांटोमध्ये लघुग्रह आदळला तर त्यामुळे 70 मैल रुंदीचं विवर तयार होईल. यात अंदाजे 58,41, 220 लोक मारले जातील. लघुग्रहाचा फायरबॉल मेक्सिको सिटीवर धडकला तर तो 40 दशलक्षाहून अधिक लोकांचा बळी घेईल. याचा परिणाम संपूर्ण देश आणि दक्षिणेकडील होंडुरासपर्यंत पोहोचू शकतो.जेव्हा सिम्युलेटर डल्लासला लक्ष्य करील तेव्हा त्याच्या धक्क्याचा परिणाम उत्तर अमेरिकेवर होईल. यूएस आणि मेक्सिकोमधील सर्व इमारती आणि घरं यात नष्ट होतील. एखादा लघुग्रह साओ पावलोच्या किनाऱ्यावर आदळला तर त्याच्या धक्क्याने दक्षिण अमेरिका नष्ट होऊ शकते. यामुळे 1.1 मैल उंचीची त्सुनामी येईल. या विवरात तीन दशलक्ष लोकांची वाफ होईल.
advertisement
8/8
लघुग्रह आदळल्यास समुद्राच्या लाटांवर परिणाम होतो. त्यामुळे विवर तयार होऊ शकते. धक्के, तीव्र वारा आणि भूकंप येऊ शकतो. हा सिम्युलेटर त्या सर्वांचे मोजमाप करतो आणि संभाव्य मृत्यूंची संख्या आणि क्षेत्र याचा डाटा देतो. हा सिम्युलेटर एक टूल आहे. यामुळे युझर जगातलं कोणतेही शहर किंवा समुद्राच्या मध्यभागी असलेले ठिकाण निवडू शकतो. अशा ठिकाणी कोणत्याही आकाराचा किंवा रचनेचा लघुग्रह धडकल्यास काय होऊ शकते, त्याचे संभाव्य परिणाम दृश्य स्वरूपात पाहता येतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
viral news :...जर पृथ्वीवरील एखाद्या शहरावर लघुग्रह आदळला तर काय होईल?