Door : दरवाजावर असे बॉक्स का असतात? ही फक्त डिझाइन नाही, यामागे आहे सायन्स
- Published by:Priya Lad
Last Updated:
Why Box On Door : तुम्ही अनेक दरवाजे आणि कॅबिनेटवर बॉक्सच्या आकाराचे डिझाइन पाहिले असतील. ज्याला आपण डिझाइन समजतो. पण हे बॉक्स खूप खास आहेत, ते असण्यामागे काहीतरी कारण आहे.
advertisement
1/5

तुम्ही घराचा मुख्य दरवाजा किंवा बाथरूम, कॅबिनेट, लाकडी फर्निचर पाहाल तर त्यावर बॉक्स दिसतील. अनेकांना ही डिझाइन वाटते. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल दरवाजावर असलेले हे बॉक्स फक्त एक डिझाइन नाही. ते सामान्य नाही तर खास आहेत.
advertisement
2/5
दरवाजांवरील या बॉक्सला पॅनल म्हणतात. जे दरवाज्यांचं संरक्षण करतात, त्यांना लवकर खराब होण्यापासून रोखतात. आता हे कसं शक्य आहे?
advertisement
3/5
लाकूड ही अशी वस्तू आहे, जी ओलाव्यामुळे विस्तारते किंवा आकुंचन पावते. जर दरवाजा सपाट केला तर तो उन्हाळ्यात, हिवाळ्यात आणि पावसातही विस्तारतो किंवा आकुंचन पावतो. जर हे वारंवार घडलं तर दरवाजाला तडे जातील, फर्निचर लवकर खराब होईल.
advertisement
4/5
पण चौकोनी बॉक्समुळे ही समस्या उद्धबवत नाही. हे बॉक्स लाकडाला आकुंचन आणि प्रसरण पावण्यापासून रोखतात. एकंदर काय तर हे बॉक्स दरवाजाचे संरक्षण करण्यासाठी अवलंबलेली एक उत्तम युक्ती आहे.
advertisement
5/5
तुम्ही आता काही सपाट दरवाजेही पाहिले असतील पण ते अशा मटेरियलपासून बनलेले आहेत की ओलावा त्यांच्यावर परिणाम करत नाही. म्हणून ते उंचावलेल्या पॅनेलशिवाय सुरक्षित राहतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Door : दरवाजावर असे बॉक्स का असतात? ही फक्त डिझाइन नाही, यामागे आहे सायन्स