Biscuit Hole : काही बिस्किटांवर होल असतात, काहींवर नाही; असं का? ही फक्त डिझाइन नाही, खरं कारण वेगळंच
- Published by:Priya Lad
Last Updated:
Hole On Biscuit : बिस्कीट, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातात. चहा-बिस्कीट हा तर कित्येकांचा सकाळचा नाश्ता आणि संध्याकाळचा स्नॅक्स आहे. या बिस्किटावर तुम्ही होलही पाहिले असतील. पण ते का असतात माहितीये?
advertisement
1/5

दुकानात तुम्ही पाहाल तुम्हाला बऱ्याच प्रकारचे बिस्किट्स दिसतात. ज्यांची चव, आकार, रंग वेगवेगळा असतो. तुम्ही नीट पाहिलं तर काही बिस्कीट्समध्ये तुम्हाला होल दिसेल तर काहींमध्ये नाही.
advertisement
2/5
बिस्किट्सवरील हे होल म्हणजे अनेकांना डिझाइन वाटतं. पण हे खास कारणासाठी असतात. या होल्सना डॉकिंग होल असं म्हणतात.
advertisement
3/5
बिस्किट्सवरील हे छिद्र बेकिंगदरम्यान वाफ आणि हवा बाहेर पडू देण्यासाठी केले जातात. यामुळे बिस्किट व्यवस्थित शिजतं, ते सपाट आणि कुरकुरीत होतं.
advertisement
4/5
पण शक्यतो क्रॅकर्स आणि नमकीन बिस्कीटमध्येच तुम्ही हे छिद्र पाहाल. गोड बिस्किट्समध्ये असे फार होल्स नसतात किंवा ते बिलकुल नसतात.
advertisement
5/5
याचं कारण म्हणजे क्रॅकर्स आणि नमकीन बिस्किट्समध्ये ओलावा असतो. गोड बिस्किट्स मऊ असतात आणि त्यांचं आवरण वेगळ्या पद्धतीने तयार केलं जातं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Biscuit Hole : काही बिस्किटांवर होल असतात, काहींवर नाही; असं का? ही फक्त डिझाइन नाही, खरं कारण वेगळंच