TRENDING:

साधी नाहीये नव्या वर्षाची सुरुवात! 2026 चा पहिलाच आठवडा, तारीख 3 जानेवारी, काहीतरी घडणाराय

Last Updated:
Wolf Supermoon Close To Earth : याआधी 2026 वर्षांबाबत भयानक भविष्यवाणी समोर आल्या आहेत. बाबा वेंगा आणि नास्त्रेदामस यांनी वर्तवलेली ही भाकीतं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते घडेल की नाही माहिती नाही. पण नव्या वर्षाची सुरुवात मात्र नक्कीच साधी नाहीये.
advertisement
1/7
साधी नाहीये 2026 वर्षाची सुरुवात! पहिलाच आठवडा, तारीख 3 जानेवारी, काही घडणाराय
2026 या नव्या वर्षाची सुरुवात झाली आहे. सगळ्यांनी नव्या वर्षाचं स्वागत केलं आहे, एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत. या वर्षात पुढे काय घडेल माहिती नाही पण या वर्षाची सुरुवात मात्र नक्कीच साधी नाही आहे. वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात असंच काहीतरी घडणार आहे.
advertisement
2/7
3 जानेवारी 2026 रोजी आकाशात दिसणारा चंद्र खास आहे. यादिवशी वर्षातील पहिली पौर्णिमा आहे. पण हा पौर्णिमेचा चंद्र साधा नाही तर सुपरमून आहे. म्हणजे तो रोजच्यासारखा किंवा नेहमीच्या पौर्णिमेसारखा दिसणार नाही तर 2026 मध्ये दिसणाऱ्या सर्वात मोठ्या आणि तेजस्वी चंद्रांपैकी एक असेल. खगोलशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की हा वर्षातून तीन ते चार सुपरमूनपैकी पहिला आहे.
advertisement
3/7
3 जानेवारीचा सुपरमून 3,56,800 किमी अंतरावर असेल, जो सरासरीपेक्षा 10% जास्त आहे.  यादिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळच्या बिंदूवर असेल, ज्यामुळे तो सामान्य पौर्णिमेपेक्षा 14% मोठा आणि 30% जास्त तेजस्वी दिसेल.
advertisement
4/7
3 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजून 3 मिनिटांनी म्हणजे भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 33 मिनिटांनी तो सर्वोच्च शिखरावर असेल पण खरी जादू सूर्यास्तानंतर होईल. 3 जानेवारीच्या संध्याकाळी पूर्व क्षितिजावर चंद्र खूपच खाली दिसेल, याला मून इल्युजन म्हणतात, जिथं चंद्र क्षितिजाच्या जवळ आणखी मोठा दिसतो.
advertisement
5/7
भारतात हे दृश्य संध्याकाळी 6-7 च्या सुमारास सुरू होईल आणि रात्रभर चमकत राहिल. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू,  कुठेही जिथं स्वच्छ आकाश असेल, तिथं.
advertisement
6/7
उत्तर भारतात थंड वारे आणि स्वच्छ आकाश यामुळे हे दृश्य आणखी नेत्रदीपक बनेल. दक्षिणेत चंद्र पूर्वेला उगवताना संध्याकाळी मोठा दिसेल. शहरी दिव्यांच्या झगमगाटीपासून दूर असलेल्या मोकळ्या मैदानावरून, छतावरून किंवा गावातून हे दृश्य पाहण्याची मजा, अनुभव तुम्हाला घेता येईल.
advertisement
7/7
आता याला वुल्फ मून का म्हणतात? तर मूळ अमेरिकन आणि युरोपियन परंपरेत जानेवारी पौर्णिमेला या नावाने ओळखलं जात असे. कारण हिवाळ्यात अन्नाची कमतरता होती, रात्र लांब होत्या आणि थंडी तीव्र होती. परिणामी, गावाबाहेर लांडगे भुकेने ओरडत असत. तेव्हापासून याल वुल्फ मून असे म्हणतात. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
साधी नाहीये नव्या वर्षाची सुरुवात! 2026 चा पहिलाच आठवडा, तारीख 3 जानेवारी, काहीतरी घडणाराय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल