TRENDING:

Weird Place : जगातील एकमेव ठिकाण, जिथं बंद होतं घड्याळ आणि रात्री 3 नंतर...

Last Updated:
2019 मध्ये या ठिकाणच्या लोकांनी संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केलं. स्थानिक लोकांनी टाइम-फ्री झोन मोहीम सुरू केली होती, ज्यामध्ये बेटाच्या पुलावर शेकडो घड्याळे बांधली गेली होती आणि इथं वेळ काम करत नाही असा संदेश देण्यात आला होता.
advertisement
1/5
Weird Place : जगातील एकमेव ठिकाण, जिथं बंद होतं घड्याळ आणि रात्री 3 नंतर...
अशा जागेची कल्पना करा जिथं तुम्हाला काहीही करण्यासाठी घड्याळाकडे पाहण्याची गरज नाही. सकाळी 10 वाजले तरी तुम्हाला उठवणार नाही, मध्यरात्री 3 वाजता खेळायलाही कुणी रोखणार नाही. नॉर्वेच्या सोमारोय आयलँड.  हे जगातील एकमेव ठिकाण आहे जिथं वेळेला काही अर्थ नाही.
advertisement
2/5
सोमारोय हे आर्क्टिक सर्कलच्या अगदी वर असलेलं 300 लोकसंख्येचं एक लहान बेट आहे. इथं 20 मे ते 18 जुलै मीडनाईट सन म्हणजे मध्यरात्रीही सूर्य असतो. 69 दिवस आणि 69 रात्र सूर्य मावळत नाही. म्हणून तुम्ही कधीही बाहेर पडू शकता.
advertisement
3/5
जिथं लोक सामान्य ठिकाणी वेळेचं पालन करतात, या ठिकाणी लोक रात्री 2-3 वाजता समुद्रकिनाऱ्यावर फुटबॉल खेळतात, मुलं पहाटे 5 वाजता मासेमारीला जातात, दुकानदार हवं तेव्हा दुकानं उघडतात. स्थानिक लोक घड्याळाकडे पाहत नाहीत. ते त्यांच्या गरजेनुसार कामं करतात. भूक लागली की खा, झोप लागली की झोपा. येथील वेळ फक्त पर्यटकांसाठी आहे.
advertisement
4/5
इथं फक्त 70 घरं, एक लहान हॉटेल आणि एक कॅफे आहे. एक शाळा देखील आहे, पण शिक्षक म्हणतात की मुलं पुरेशी झोप घेतल्याशिवाय वर्गात येत नाहीत. शिक्षक त्यांना सक्ती करत नाहीत. लग्न, वाढदिवस, सण सर्व काही हवामान चांगलं असताना घडतं. याचा अर्थ असा की इथं सर्व काही तुमच्या मूडवर आधारित आहे, घड्याळावर नाही.
advertisement
5/5
इथं उन्हाळ्यात सूर्य कधीच मावळत नाही तर हिवाळ्यात नेमकं याच्या उलट होतं. नोव्हेंबर ते जानेवारी पर्यंत सूर्य अजिबात उगवत नाही. याला पोलर नाईट म्हणतात. पण हा अंधार भयावह नसून जादूई असतो. दररोज रात्री नॉर्दर्न लाइट्स दिसतात. आकाशात रंगबेरंगी प्रकाश दिसतो. लोक रात्रभर बाहेर बसून हिरव्या-जांभळ्या लाइट्सचा आनंद घेतात. ते पाहण्यासाठी अनेक देशांतून लोक येतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Weird Place : जगातील एकमेव ठिकाण, जिथं बंद होतं घड्याळ आणि रात्री 3 नंतर...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल