पुत्र-पुत्रीच्या प्रेमामुळे पक्षात फूट
अमित शहा म्हणाले, की मी पुन्हा पुन्हा सांगतो की, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष पुत्र-पुत्रीच्या मोहापायी विभागले आहेत. उद्धव ठाकरे यांना त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवायचं होतं, तर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादीच्या नेत्या बनवायचे होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेत काम करणाऱ्यांनी आधी उद्धव ठाकरेंना आपला नेता म्हणून स्वीकारले. पण त्यांनी आदित्य यांना आपला नेता मानण्यास नकार दिला. पवारांनाही आपली मुलगी सुळे यांना राष्ट्रवादीच्या नेत्या बनवायचे होते. हे मान्य करायला तयार नसलेल्या अनेकांनी पक्ष सोडले.
advertisement
ठाकरे कुठे चुकले?
शहा म्हणाले की जर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना योग्य सन्मान दिला असता तर शिवसेना कधीच फुटली नसती. तर दुसरीकडे शरद पवार यांनी अजित पवार यांना योग्य वागणूक न दिल्याने अजितदादांनी त्यांची साथ सोडली नसते. शिंदे आणि अजित पवार आमच्यासोबत कधीच आले नसते. कारण, ते सत्तेत होते. मात्र, अनेक ठिकाणी अपत्यप्रेमापोटी पक्ष फुटलेले आपण पाहिले आहेत.
वाचा - पवारांच्या भेटीनंतर ज्योती मेटे यांनी घेतला मोठा निर्णय! पंकजा मुंडेंना निवडणूक जड जाणार?
महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकणार
लोकसभा निवडणुकीत भाजपने आघाडी घेत महाराष्ट्रात आपले 20 उमेदवार जाहीर केले आहेत. तर आणखी दुसरी यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे. यावेळी 2019 लोकसभा निवडणुकांपेक्षा जास्त जागा मिळण्याचा दावा अमित शहा यांनी केला आहे.
