TRENDING:

मासिक पाळीत ऐच्छिक रजा, 'मविआ'च्या जाहीरनाम्यावर महिला काय म्हणतात? 

Last Updated:

Mahavikas Aghadi Manifesto: महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी आपला महाराष्ट्रनामा प्रसिद्ध केला आहे. यात महिलांना मासिक पाळीत ऐच्छिक रजा देण्याचं आश्वासन दिलंय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रीती निकम, प्रतिनिधी
advertisement

सांगली: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जनतेला विविध आश्वासनं दिली जात आहेत. तसेच जाहीरनामे, वचननाम्यांतून मतदारांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यातच महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्रनामा’ नावाचा संपूर्ण जाहीरनामा प्रकाशित केला आहे. या जाहीरनाम्यामध्ये महाविकास आघाडीने महिला सक्षमीकरणच्या काही योजना समाविष्ट केल्या आहेत. मविआ' च्या या महाराष्ट्रनाम्यात मासिक पाळीत महिलांना 2 दिवसांची ऐच्छिक रजा देणार असल्याचं म्हटलंय. यावर महिला वर्गातून सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. सांगलीतील सामाजिक कार्यकर्त्या सुषमा राजेघोरपडे यांनी याबाबत लोकल18 शी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे

advertisement

महिला सक्षीकरणाच्या जाहीरनाम्याचं स्वागत

“महाविकास आघाडीने महाराष्ट्रनाम्यामध्ये घोषित केलेल्या महिलाविषयक पाचही योजनांचे आम्ही स्वागत करतो. विशेष म्हणजे 'मासिक पाळी दरम्यान दोन दिवस महिलांना ऐच्छिक सुट्टी देणं' ही काळाची गरज आहे. अनेक सरकारं आली आणि गेली; पण महिला आरोग्यविषयक इतका महत्त्वपूर्ण निर्णय कोणत्याचं सरकारने आजवर घेतला नाही. मासिक पाळी दरम्यान महिलांना शारीरिक आणि मानसिक तणावातून जावे लागते. अशा स्थितीमध्ये घरची आणि कामाच्या ठिकाणची जबाबदारी सांभाळताना महिलांचे हाल होतात. अशा अवस्थेत कामाचा तणाव सांभाळताना महिलांची घुसमट होते. त्यामुळे मासिक पाळी दरम्यान महिलांना ऐच्छिक सुट्टी असणं अतिशय गरजेचं वाटतं”, असं सुषमा राजेघोरपडे म्हणाल्या.

advertisement

भाजपचा बालेकिल्ला धंगेकरांनी भेदला, पण आता आव्हान पेलणार का? कसब्यात कोण मारणार बाजी?

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या जाहीरनाम्यातील घोषणांची माहिती दिली आहे. यामध्ये महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने पाच घोषणांचा समावेश केला आहे. विशेष म्हणजे यामध्ये महिलांना मासिक पाळी मध्ये दोन दिवसीय ऐच्छिक रजा देण्याचे आश्वासन दिल्याने महिला वर्गातून या आश्वासनाचे स्वागत होत आहे.

advertisement

मविआ'ची महिलांसाठी आश्वासने

महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 3000 रुपये देण्यात येणार

महिलांना मोफत बस प्रवास

मुलींसाठी निर्भय महाराष्ट्र धोरण

गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंधक मोफत लस

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पावसामुळे लिंबू झाले 'कडू', किलोला इतका भाव, शेतकऱ्यांना आलं रडू, Video
सर्व पहा

मासिक पाळीच्या दिवसात 2 दिवस ऐच्छिक रजा.

मराठी बातम्या/Politics/
मासिक पाळीत ऐच्छिक रजा, 'मविआ'च्या जाहीरनाम्यावर महिला काय म्हणतात? 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल