छत्रपती संभाजीनगर : राज्यात विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजलेलं आहे. सर्वच राजकीय नेते, कार्यकर्ते आणि उमेदवार आता प्रचाराला लागलेले आहेत. या प्रचारामध्ये पक्षाचे चिन्ह असणाऱ्या टोपी, उपरणे, फेटे आणि झेंड्यांना चांगलंच मार्केट असतं. त्यामुळे सध्या विविध राजकीय पक्षांकडून प्रचार साहित्याला मोठी मागणी आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये समित बोरा हे गेल्या काही वर्षांपासून हे साहित्य विकतात. यंदा प्रचार साहित्याचे ट्रेंड काय आहेत? आणि त्याच्या किमती काय आहेत? याबाबत जाणून घेऊ.
advertisement
5 रुपयांत उपरणे
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांची टोपी आणि उपरणे (गमछा) यांना मोठी पसंती असते. त्यामुळे राजकीय पक्षांकडूनही कार्यकर्त्यांना हे वाटले जातात. यंदा मार्केटमध्ये विविध प्रकारच्या टोपी आणि उपरणी दाखल झाली आहेत. यामध्ये अगदी उलनपासून ते एम्ब्रोइडरी वर्क असलेली उपरणी देखील भाव खात आहेत. महिला वर्गाची त्याला चांगलीच पसंती मिळत आहे. होलसेल दरात अगदी 5 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत उपरणी उपलब्ध असल्याचे विक्रेते बोरा सांगतात.
बालेकिल्ल्यातून घड्याळ गायब! 25 वर्षांत हे पहिल्यांदाच घडलं, जिल्ह्यात एकही उमेदवार का नाही?
झेंड्यांना मोठी मागणी
सध्या प्रत्येक पक्षाच्या झेंड्याला देखील मोठी मागणी आहे. अगदी 10 रुपयांपासून ते 350 रुपयांपर्यंत झेंडे उपलब्ध आहेत. झेंड्यात देखील विविध प्रकार असून लहान आणि मोठ्या आकारात ते उपलब्ध आहेत. तर प्रत्येक निवडणुकीत घातली जाणारी टोपीही अगदी अडीच रुपयांत उपलब्ध आहे. अडीच रुपयांपासून ते 25 रुपयांपर्यंत टोपीच्या किमती आहेत. मात्र, अडीच रुपयांच्या टोपीला अधिक मागणी असल्याचं विक्रेते सांगतात.
कमळ की तुतारी? कुणी केलंय मार्केट जाम? पुण्यातील झेंडेवाल्याच्या दुकानातून थेट Video
बॅच खातायेत भाव
निवडणुकीत विविध पक्षांचे बॅच किंवा ब्रोचला देखील मोठी मागणी आहे. यामध्ये काही व्हरायटी उपलब्ध आहेत. ऍक्रेलिक, डायमंड असे प्रकार त्यात उपलब्ध असून 5 रुपयांपासून ते 350 रुपयांपर्यंत त्याच्या किमती आहेत. सध्या गमछा म्हणजेच उपरणे आणि ब्रोचला मोठी मागणी असल्याचं विक्रेते बोरा सांगतात.





