कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजल्यापासूनच कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ राज्यभर चर्चेत आला. मोठ्या राजकीय नाट्यानंतर या मतदार संघात 2 राजेशमध्ये सामना होतोय. शिवसेनेचे राजेश क्षीरसागर आणि काँग्रेस महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांच्यातच खरी चुरस आहे. दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे केले जात असले तरी कोल्हापूरच्या जनतेचा कौल नेहमीच धक्के देणारा असतो. त्यामुळे कोल्हापूर उत्तरच्या जनतेनं आपलं ‘उत्तर’ काय शोधलंय हे लोकल18 सोबत बोलतना सांगितलं.
advertisement
मतदार संघाची स्थिती
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय समीकरणे बदललेली आहेत. कधी काँग्रेसचा विरोध करणारी शिवसेना आता दोन गटांत विभागली आहे. एक गट भाजपा पक्षात आहे, तर दुसरा गट काँग्रेससोबत निवडणूक लढवणार आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस देखील दोन गटांमध्ये विभागलेली आहे. त्यामुळे, महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात चुरशीचा मुकाबला होण्याची शक्यता आहे.
आमदार व्हत्येती, पैसं कमवत्येती अन् जात्याती..! ऊसतोड मजूर महिलेनं पुढाऱ्यांना धू धू धुतलं, Video
राजेश क्षीरसागर यांची तयारी
महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर हे गेल्या पाच वर्षांपासून आमदारकीच्या तयारीत आहेत. त्यांनी फक्त कोल्हापूर उत्तर मतदारसंघ नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्याच्या तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी मंजूर करून आणलाय. त्यांच्या माध्यमातून रंकाळ्याचा विकास, महात्मा गांधी मैदानाचा सुशोभीकरण, तसेच शहराच्या रस्त्यासाठी शंभर कोटींचा निधी उपलब्ध केलेला आहे, अशी भावना मतदारसंघातील नागरिक व्यक्त करत आहेत.
नागरिकांना मिंधे ठेवण्याचा प्रकार
विकासाच्या मुद्द्यावर कोल्हापुरातील राजकारण ढवळून निघत आहे. “लाडकी बहीण योजनेतून दिलेले पैसे हे महिलांना मिंधे ठेवण्यातला प्रकार आहे. बाजारातील वाढत्या महागाईमुळ पुरुषांच्या खिशाला चाप बसत आहे. तसेच सत्ताधाऱ्यांकडून विविध घोषणा केल्या जात आहेत. पण त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारच्या योजना पूर्ण झाल्या नाहीत. मतदार संघातील पाण्याचा प्रश्न आणि रस्त्यांचा प्रश्न जैसे थे आहे,” अशी भावना मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत.
महायुती की महाविकास आघाडी, पुणेकरांचे विचार काय? तुळशीबागेत निवडणुकीची रंगली चर्चा
हाताला काम द्या
आजच्या तरुणांपुढे रोजगारांची मोठ्या प्रमाणात समस्या आहे. सरकारने रोजगार देण्याचा विचार केला पाहिजे. महिलांसाठी लाडक्या बहिणी मार्फत पैसे येण्याऐवजी महिलांना त्यांच्या गरजेसाठी रोजगार मिळवून द्यावा. त्यासाठी काही प्रकल्प राबविण्यात यावेत. मात्र महायुती सरकारचं याकडे दुर्लक्ष आहे, अशी भावना काही तरुण मतदारांनी व्यक्त केली.