महायुती की महाविकास आघाडी, पुणेकरांचे विचार काय? तुळशीबागेत निवडणुकीची रंगली चर्चा
- Published by:Devika Shinde
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
निवडणुका ह्या आता अवघ्या काहीच दिवसावार आल्या आहेत आणि कोणाच सरकार येणार या कडे महाराष्ट्रासह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
प्राची केदारी-प्रतिनिधी, पुणे : संपूर्ण राज्यभरात सध्या निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरु आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत असून, सत्ता नेमकी कोणाची येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. याच अनुषंगाने पुण्यातील गजबजलेला तुळशीबाग मार्केट आणि भाजी मंडई परिसरातील नागरिकांची मते जाणून घेतली.
निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे पुणे जिल्ह्यातील जनतेत उत्सुकता आहे. पुण्यातील एकूण आठ मतदारसंघांत काही ठिकाणी दुहेरी तर काही ठिकाणी तिरंगी लढती रंगतदार होत आहेत. काही पक्षांतील अंतर्गत वादामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे, परंतु कोणता उमेदवार निवडून येणार यापेक्षा कोणते सरकार सत्तेत येणार याची अधिक उत्कंठा पुणेकरांमध्ये दिसून येत आहे.
पुणेकरांच्या मते, महायुतीचे सरकार आल्यास त्यांच्या सामाजिक प्रश्नांना अधिक गांभीर्याने हाताळले जाईल. महायुतीच्या नेतृत्वात मेट्रोसह अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना गती मिळाल्याचे पुणेकर सांगत आहेत. त्यामुळे महायुतीला मत देण्याचे मनोदय त्यांनी व्यक्त केले.
advertisement
महागाई, रोजगार आणि रस्ते सुधारणा हे प्रलंबित प्रश्न असून, हे प्रश्न सोडवणारे सरकार आम्हाला हवे आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. महायुतीचे सरकार आल्यास त्यांचे प्रश्न सुटतील असा विश्वास पुणेकर व्यक्त करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
November 13, 2024 6:13 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
महायुती की महाविकास आघाडी, पुणेकरांचे विचार काय? तुळशीबागेत निवडणुकीची रंगली चर्चा