विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यासह आघाडीतील 25 घटक पक्ष सहभागी झाले. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, संजय राऊत, अखिलेश यादव, प्रियांका गांधी आदींसह जवळपास 300 खासदार मोर्चात सहभागी झाले होते. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच कर्नाटकमधील एक विधानसभा मतदारसंघात झालेल्या कथित बोगस मतदारांचा पुराव्यांसह आरोप केला होता. त्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजपने निवडणूक आयोगाच्या संगनमताने लोकसभा निवडणूक जिंकली असल्याचा आरोप विरोधकांनी केला.
advertisement
राहुल गांधींसह अनेक खासदार ताब्यात, पहिली प्रतिक्रिया समोर...
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर संताप व्यक्त करताना संयमी प्रतिक्रिया व्यक्त केली. राहुल गांधी यांनी म्हटले की, ही लढाई राजकीय नाही. संविधान वाचवण्यासाठी आम्ही लढतोय असं राहुल गांधी म्हणाले. संविधानाने दिलेले 'एक व्यक्ती एक मत' या मूल्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत. आम्हाला स्पष्ट आणि सुरक्षित मतदार यादी पाहिजे अशी आग्रही मागणी पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी केली.
दिल्ली पोलिसांकडून मोर्चा कोंडी....
कोणत्याही परिस्थितीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढू न देण्याचा प्रयत्न दिल्ली पोलिसांनी केला. मोर्चासाठी इंडिया आघाडीचे खासदार संसदेच्या परिसरात जमले. त्यावेळी पोलिसांनी संसदेच्या प्रवेशद्वाराजवळच बॅरिकेट लावत खासदारांची कोंडी केली.