Sharad Pawar : खासदारांच्या आंदोलनात शरद पवार जखमी? दाव्याने खळबळ, इंडिया आघाडीचा मोर्चा पोलिसांनी रोखला

Last Updated:

Sharad Pawar : खासदारांचा मोर्चा अडवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला. याच दरम्यान ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार जखमी झाल्याचा दावा करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली.

खासदारांच्या आंदोलनात शरद पवार जखमी? इंडिया आघाडीचा मोर्चा पोलिसांनी रोखला
खासदारांच्या आंदोलनात शरद पवार जखमी? इंडिया आघाडीचा मोर्चा पोलिसांनी रोखला
नवी दिल्ली: विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीच्या खासदारांनी आज संसद भवन ते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला अटकाव केला. पोलिसांनी मोर्चाला अटकाव केल्यानंतर काहीवेळ रेटारेटी झाल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी मोर्चाला अटकाव केल्याने संतप्त झालेल्या खासदारांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. खासदारांचा मोर्चा अडवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला. याच दरम्यान ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार जखमी झाल्याचा दावा करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली.
विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यासह आघाडीतील 25 घटक पक्ष सहभागी झाले. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, शरद पवार, संजय राऊत, अखिलेश यादव, प्रियांका गांधी, सुप्रिया सुळेंसह आदींसह जवळपास 300 खासदार मोर्चात सहभागी झाले होते. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच कर्नाटकमधील एक विधानसभा मतदारसंघात झालेल्या कथित बोगस मतदारांचा पुराव्यांसह आरोप केला होता. त्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजपने निवडणूक आयोगाच्या संगनमताने लोकसभा निवडणूक जिंकली असल्याचा आरोप विरोधकांनी केला.
advertisement

दिल्ली पोलिसांकडून मोर्चा कोंडी, खासदारांकडून ठिय्या आंदोलन...

कोणत्याही परिस्थितीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढू न देण्याचा प्रयत्न दिल्ली पोलिसांनी केला. मोर्चासाठी इंडिया आघाडीचे खासदार संसदेच्या परिसरात जमले. त्यावेळी पोलिसांनी संसदेच्या प्रवेशद्वाराजवळच बॅरिकेट लावत खासदारांची कोंडी केली. दिल्ली पोलिसांसह दंगल नियंत्रक पथकांसह मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात होते.

शरद पवार जखमी?

advertisement
पोलिसांनी संसद परिसरात बॅरिकेट्स लावत खासदारांना अटकाव केला. त्यामुळे काहीसा गोंधळ उडाला. पोलिसांसोबत संघर्ष होण्याची स्थिती उद्भवली होती. याच दरम्यान एकाने माध्यमांशी बोलताना शरद पवार जखमी झाल्याचा दावा केला.

निवडणूक आयोगावर मोर्चा कशाला?

विरोधकांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ई-व्होटर लिस्टची मागणी केली आहे. त्याशिवाय, मतदानाच्या वेळीचे सीसीटीव्ही फुटेजची मागणीदेखील विरोधकांनी केली आहे. निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात आला.
advertisement

महिला खासदार आक्रमक...

पोलिसांनी बॅरिकेट्स लावून मोर्चाला अटकाव केला. मात्र, महिला खासदारांनी बॅरिकेट्सवर चढत निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला.
view comments
मराठी बातम्या/देश/
Sharad Pawar : खासदारांच्या आंदोलनात शरद पवार जखमी? दाव्याने खळबळ, इंडिया आघाडीचा मोर्चा पोलिसांनी रोखला
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement