TRENDING:

7 वर्षांनी दिसणारं दुर्मीळ फूल महाराष्ट्रात, कास पठारावर नाही, खास ठिकाणी फुलली कारवी!

Last Updated:

यंदा कास पठारावर सुंदर फुलांचा बहर आलाच आहे, शिवाय राज्यात आणखी एका ठिकाणी दुर्मीळ फुलांचा बहर पाहायला मिळतोय. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्राची केदारी, प्रतिनिधी
advertisement

पुणे : आपलं राज्य नैसर्गिक संपत्तीनं परिपूर्ण आहे. साताऱ्याला तर अतिशय सुरेख असा निसर्ग लाभलाय. इथं फुलं पाहण्याचं सुख तर काही औरच आहे.

सातारच्या कास पठारावर फुललेली अद्वितीय रंगीबेरंगी फुलं पाहण्यासाठी देश, विदेशातून पर्यटक येतात. बराच वेळ फुलांच्या सान्निध्यात घालवतात. जी फुलं जगात कुठेच दिसत नाहीत किंवा अनेक वर्षांमधून क्वचितच फुलतात, ती कास पठारावर पाहायला मिळतात. यंदा इथल्या फुलांना दरवर्षीप्रमाणे सुंदर बहर आलाच आहे, शिवाय राज्यात आणखी एका ठिकाणी दुर्मीळ फुलांचा बहर पाहायला मिळतोय.

advertisement

विकेंडला कुठं जायचं? असं प्लॅनिंग सुरू असेल तर पटकन आपल्या डोळ्यासमोर येतो लोणावळा. इथला निसर्ग डोळे दिपवणारा आणि थंडी हुडहुडी भरवणारी असते. याच लोणावळ्यात 25 ते 30 एकर पठारावर फुलं फुलली आहेत. निळ्या, जांभळ्या रंगाची ही अत्यंत आकर्षक अशी फुलं पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं लोणावळ्याकडे वळताहेत. सध्या ही फुलं पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहेत. विशेष म्हणजे पर्यटकांसह अभ्यासकदेखील ही फुलं पाहण्यासाठी येत आहेत. लोक या फुलांसोबत मनसोक्त फोटो काढतात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात चढ-उतार, कांदा आणि मक्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

लोणावळ्यात फुललेल्या फुलांचं नाव आहे 'कारवी'. हे एक दुर्मीळ झुडूप आहे. जे प्रामुख्यानं पश्चिम घाटाच्या सखल टेकड्यांमध्ये संपूर्ण भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आढळतं. गार वातावरण अनुभवण्यासाठी लोणावळ्यात येणारे पर्यटक आता खास फुलांचा बहर पाहण्यासाठी इथं येऊ लागले आहेत.

मराठी बातम्या/पुणे/
7 वर्षांनी दिसणारं दुर्मीळ फूल महाराष्ट्रात, कास पठारावर नाही, खास ठिकाणी फुलली कारवी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल