पिंपरी चिंचवड प्रदूषणाच्या विळख्यात
उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडचा विकास झपाट्याने होत आहे. हा विकास होत असतानाही पर्यावरणाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले जात आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आरएमसी प्रकल्पांसाठी अत्यंत कठोर नियम घालून दिले आहेत, पण अनेक प्रकल्प चालवणारे या नियमांचे उल्लंघन करत आहेत.
नवरा-नवरी तयार, वऱ्हाडीही जमले, पण विवाह नोंदणी अधिकाऱ्याची ती अट, अन् सगळ्यांनाच फुटला घाम! शेवटी..
advertisement
प्रदूषण नियंत्रण मंडळाने वायुप्रदूषणासाठी कारणीभूत ठरणारे आणि नियमांचे पालन न करणाऱ्या शहरातील 30 प्रकल्पांची यादी महापालिकेच्या पर्यावरण विभागाला दिली आहे. शहरातील पर्यावरणविषयक समस्या आणि तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी महापालिकेने दोन तपासणी पथकांची नेमणूक केली आहे.
तपासणी पथकांनी ताथवडे, पुनावळे, पिंपळे, निलख आणि मोशी परिसरातील आरएमसी प्रकल्पांची तपासणी केली. त्यात नऊ प्रकल्पांमध्ये ‘वॉटर स्प्रिंकलिंग सिस्टम’ नसणे, मिक्सिंग खुल्या जागेत करणे, आणि खडी, वाळू व क्रश सँड वाहतुकीदरम्यान ताडपत्रीचा वापर न करणे अशी उल्लंघने आढळली. या प्रकल्पांमुळे हवेची गुणवत्ता खराब होत असल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे पर्यावरण विभागाने तात्काळ कारवाई करत या प्रकल्पांवर टाळे ठोकले आहे.
आरएमसी प्रकल्पांबाबत कार्यकारी अभियंता हरविंदर बन्सल यांनी सांगितले की, प्रकल्पाच्या परिसरात धूळ नियंत्रणासाठी वॉटर स्प्रिंकलिंग सिस्टम वापरावी, मिक्सिंग काम बंद जागेत करावे, खडी, वाळू आणि क्रश सँड वाहतूक करणाऱ्या वाहनांना ताडपत्रीने झाकावे, तसेच आरएमसी प्रकल्प मर्यादित वायुप्रदूषणाच्या पातळीतच कार्यान्वित ठेवावेत. प्रकल्पाच्या परिसरातील ध्वनीची पातळी निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त नसावी, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.






