थोडा संयम बाळगा! ४ डिसेंबरपासून ३ राशींच्या व्यक्तींनी फक्त पैसे मोजायचे, आनंदी आनंद येणार

Last Updated:

Astrology News : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक कालांतराने राशी, नक्षत्र आणि नक्षत्र पद बदलत असतो. या हालचालींमुळे १२ राशींवर शुभ किंवा अशुभ परिणाम दिसून येतात.

astrology news
astrology news
मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक कालांतराने राशी, नक्षत्र आणि नक्षत्र पद बदलत असतो. या हालचालींमुळे १२ राशींवर शुभ किंवा अशुभ परिणाम दिसून येतात. ज्योतिषात शुक्र हा संपत्ती, ऐश्वर्य, भौतिक सुख, सौंदर्य आणि आकर्षणाचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे शुक्राच्या प्रत्येक गोचराकडे ज्योतिषप्रेमींचे विशेष लक्ष असते.
पंचांगानुसार आता दैत्यगुरू शुक्र ४ डिसेंबर रोजी सकाळी १०.२२ वाजता अनुराधा नक्षत्राच्या तृतीय पदात गोचर करणार आहे. विशेष म्हणजे हा शुभ गोचर दत्त जयंतीच्या दिवशी होत असल्याने त्याचे फल अधिक प्रभावी मानले जात आहे. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, शुक्राचा हा नक्षत्र पद गोचर काही राशींकरिता अत्यंत सकारात्मक ठरणार असून, त्यांच्या जीवनात आर्थिक, व्यावसायिक आणि वैयक्तिक स्तरावर महत्त्वपूर्ण बदल घडू शकतात.
advertisement
कुंभ : राशीसाठी हा गोचर अत्यंत शुभ मानला जात आहे. या राशीतील व्यक्तींच्या मनातील अनेक अपूर्ण इच्छा या काळात पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. भाग्याची उत्तम साथ मिळेल. आध्यात्मिकतेकडे ओढ वाढेल. व्यवसायातील अडकलेली कामे गती घेतील. जर नवीन प्रकल्प, गुंतवणूक किंवा काम सुरू करण्याचा विचार असेल, तर या काळात यशाची शक्यता अधिक आहे. घरात ऐश्वर्य आणि भौतिक सुखात वाढ होईल.
advertisement
मेष : राशीसाठीदेखील हा गोचर लाभदायी ठरेल. भाग्य तुमच्या पाठीशी मजबूतीने उभे राहील. या काळात करिअर आणि व्यवसायात उल्लेखनीय प्रगती दिसून येईल. नोकरीत पदोन्नतीचे संकेत आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना विशेष यश लाभू शकते. अविवाहितांना चांगल्या विवाह प्रस्तावांची प्राप्ती होईल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. संधी ओळखून तिचा योग्य फायदा घेतल्यास आर्थिक स्थैर्य वाढेल.
advertisement
मकर : राशीसाठी तर हा गोचर अत्यंत परिवर्तनकारी ठरणार आहे. नशीब प्रबळ होऊन अनेक अडथळे दूर होतील. जीवनातील काही महत्त्वाच्या इच्छा या काळात पूर्ण होऊ शकतात. ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक ती प्रेरणा आणि मनोबल वाढेल. आपल्या आसपासच्या वातावरणात सकारात्मकता वाढल्याचे जाणवेल. कुटुंबात सौहार्द आणि आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवनात गोडी वाढेल आणि गैरसमज दूर होतील. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे.
advertisement
एकूणच, शुक्राचे अनुराधा नक्षत्रातील हे तृतीय पद गोचर काही राशींसाठी अत्यंत शुभ आहे. नवीन कार्याची सुरुवात, गुंतवणूक, करिअरविषयक निर्णय यासाठी हा काळ अनुकूल मानला जातो. मात्र इतर राशींनाही या काळात मानसिक शांती, ऐश्वर्यवृद्धी आणि संबंधांमध्ये सौख्य अनुभवायला मिळू शकते. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, शुक्राचा हा विशेष गोचर आगामी काळात अनेकांना नवी दिशा देणारा ठरू शकतो.
advertisement
(सदर बातमी फक्त माहिती करिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
थोडा संयम बाळगा! ४ डिसेंबरपासून ३ राशींच्या व्यक्तींनी फक्त पैसे मोजायचे, आनंदी आनंद येणार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement