ऐन निवडणुकीच्या काळात पुणेकरांची गैरसोय होण्याची शक्यता, PMPML कडून प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन
- Reported by:Prachi Balu Kedari
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
महानगर पालिकेच्या आगामी निवडणूक प्रक्रियेसाठी मतदान पेट्या तसेच निवडणूक साहित्यांच्या ने- आणसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या तब्बल 1056 बसेस वापरण्यात येणार आहेत.
पुणे: महानगर पालिकेच्या आगामी निवडणूक प्रक्रियेसाठी मतदान पेट्या तसेच निवडणूक साहित्यांच्या ने- आणसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) तब्बल 1056 बसेस वापरण्यात येणार आहेत. यामुळे 14 आणि 15 जानेवारी रोजी पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरातील काही मार्गांवरील नियमित बससेवा मर्यादित स्वरूपात उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना बस उशिरा येणे, फेऱ्या कमी होणे अथवा काही वेळा थांब्यांवर जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागू शकते, अशी माहिती PMPML प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
निवडणूक ही लोकशाहीची महत्त्वाची प्रक्रिया असून तिचे कामकाज सुरळीत पार पडावे, यासाठी परिवहन महामंडळाकडून विशेष जबाबदारी पार पाडली जात आहे. मतदान पेट्या, ईव्हीएम मशीन्स आणि निवडणूक कर्मचारी यांच्या वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात बसेस सोबतच निवडणूक कामासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. शहरातील काही मुख्य तसेच उपनगरीय मार्गांवरील प्रवासी सेवेवर याचा थेट परिणाम होणार आहे.
advertisement
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर PMPML प्रशासनाने प्रवाशी नागरिकांना प्रवासाचे योग्य नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. शक्य असल्यास पर्यायी बस मार्गांचा वापर करावा, लवकर किंवा गर्दी नसलेल्या वेळेत प्रवासाची योजना आखावी, तसेच अत्यावश्यक नसल्यास प्रवास टाळावा, असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे. विशेषतः कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी, महिला प्रवासी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी या सूचनेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे सांगण्यात आले आहे.
advertisement
दरम्यान, निवडणूक कामकाज पूर्ण झाल्यानंतर सर्व बसेस पुन्हा नियमित सेवेत दाखल करण्यात येणार असल्याचे PMPML प्रशासनाने स्पष्ट सांगितले आहे. प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे. निवडणूक काळात होणाऱ्या तात्पुरत्या अडचणी लक्षात घेऊन संयम राखण्याचे आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 12, 2026 4:11 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
ऐन निवडणुकीच्या काळात पुणेकरांची गैरसोय होण्याची शक्यता, PMPML कडून प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन









