अमरावतीत राणांसोबत युती तोडली, भाजपचे जोरदार प्रहार, नवनीत राणा आमच्यात राहून....

Last Updated:

भारतीय जनता पक्षाने राणांच्या छोट्याशा पक्षाला नऊ जागा दिल्या होत्या, मात्र रवी राणांची भूक मोठी होती ती भूक आम्ही शमवू न शकल्याने आम्ही ही युती तोडली आहे, असे प्रवीण पोटे म्हणाले.

प्रवीण पोटे-नवनीत राणा
प्रवीण पोटे-नवनीत राणा
अमरावती: भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाची युती तुटल्यानंतर भाजपने रवी राणा आणि त्यांच्या युवा स्वाभिमान पक्षावर जोरदार हल्ला चढविला आहे. आम्हाला राणांच्या कुबड्याची गरज नसल्याची टीका भाजपचे नेते व माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अमरावतीत राणा विरुद्ध पोटे वाद सुरू होण्याची शक्यता आहे.
भाजप हा मोठा पक्ष आहे आणि मोठा भाऊ म्हणून आम्ही प्रत्येकाला घेऊन चालण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे युवा स्वाभिमानला आम्ही हात देऊन युती करण्याचा प्रयत्न केला. तरीही भारतीय जनता पक्षाने राणांच्या छोट्याशा पक्षाला नऊ जागा दिल्या होत्या, मात्र रवी राणांची भूक मोठी होती ती भूक आम्ही शमवू न शकल्याने आम्ही ही युती तोडली आहे, असे प्रवीण पोटे म्हणाले.
advertisement

आमच्यासोबत राहायचं आणि घरातल्यांसाठी मतं मागायची, नवनीत राणांवर प्रहार

खरे तर आम्हाला कोणाच्याही कुबड्यांची गरज नाही. आम्ही मित्रपक्ष म्हणून सोबत घेतले, परंतु त्यांची भूक मोठी आहे, त्यांना त्यांचा मार्ग मोकळा आहे, असे पोटे म्हणाले. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही कमळासाठी मतदान मागतो. दुसऱ्या कोणासाठीही आम्ही मतदान मागत नाही. पण काही आमचे नेते आमच्या सोबत राहतात आणि आमच्याच खिशात हात घालतात. आमच्या सोबत राहायचं आणि आमच्या विरोधात बोलून त्यांच्या घरातल्या लोकांसाठी मतदान मागत असल्याचा गंभीर आरोप नाव न घेता नवनीत राणा यांच्यावर केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अमरावतीत राणांसोबत युती तोडली, भाजपचे जोरदार प्रहार, नवनीत राणा आमच्यात राहून....
Next Article
advertisement
ZP Election: मोठी बातमी!  जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय?
मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश र

  • सुप्रीम कोर्टाची मुदत ओलांडली जाण्याचे संकेत होते

  • लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

View All
advertisement