बारामती विमानतळाजवळ सकाळी ८.४५ वाजेच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला होता. या अपघातात अजितदादांसह ५ जणांचा मृत्यू झाला. सकाळी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेऊन रुणालयात पाठवण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास AAIB – एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडे सोपवण्यात आला होता. संध्याकाळी ४ वाजेच्या सुमारास AAIB चे महासंचालक स्वतः घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी घटनास्थळीची पाहणी केली आणि विमानातला महत्त्वाचा असलेला ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला आहे. ब्लॅक बॉक्समुळे अपघाताच्यावेळी विमानात काय घडलं होतं, याची समोर येणार आहे.
advertisement
ब्लॅक बॉक्स काय काम करतो?
ब्लॅक बॉक्समध्ये प्रत्यक्षात दोन उपकरणे असतात. CVR (Cockpit Voice Recorder) पायलटचा आवाज, संभाषण, कॉकपिटचा आवाज रेकॉर्ड करतो. FDR (Flight Data Recorder) विमानाचा वेग, उंची, इंजिनची माहिती, तांत्रिक डेटा जतन करतो. या दोन्हींना एकत्रितपणे ब्लॅक बॉक्स म्हणतात. ते विमानाच्या मागील भागात स्थापित केले जाते कारण अपघातात कमीत कमी नुकसान होते.
हा ब्लॅक बॉक्स एका अतिशय खास तंत्राचा वापर करून बनवला आहे जेणेकरून तो अपघात, आग, पाणी आणि धक्क्यांना तोंड देऊ शकेल. मजबूत मटेरियलपासून बनवलेला ब्लॅक बॉक्सचा बाह्य भाग टायटॅनियम किंवा स्टेनलेस स्टीलचा बनलेला आहे, जो एक अतिशय शक्तिशाली धातू आहे.
तीव्र आगीतही टिकून राहतो. 1100°C पर्यंतच्या आगीत सुमारे 60 मिनिटे टिकून राहण्यासाठी हे डिझाइन केलेले आहे. म्हणजे, विमान जळले तरी त्याचा डेटा सुरक्षित राहतो. जास्त दाब आणि पाण्यातही सुरक्षित: जर विमान समुद्रात पडले तर हा ब्लॅक बॉक्स 20,000 फूट खोलीपर्यंत पाणी आणि दाब सहन करू शकतो.
आतील थर सुरक्षा प्रदान करतो. ब्लॅक बॉक्सच्या आत अनेक थर आहेत, ज्यामध्ये इन्सुलेशन, थर्मल प्रोटेक्शन आणि शॉक अॅब्सॉर्बर यांचा समावेश आहे, जे कोणत्याही टक्कर किंवा तापमानापासून आत डेटाचे संरक्षण करतात. ब्लॅक बॉक्समध्ये पाण्याखालील लोकेटर बीकन देखील आहे, जो पाण्यात पडल्यावर सिग्नल पाठवतो. हा सिग्नल सुमारे 30 दिवस टिकतो, जो शोध पथकाला तो शोधण्यास मदत करतो.
अजितदादांच्या विमानाचा कसा झाला अपघात?
बारामती विमानतळ हा अनियंत्रित (Uncontrolled) विमानतळ आहे. इथं हवाई वाहतुकीची माहिती स्थानिक फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशनमधील प्रशिक्षक किंवा पायलट देतात. ATC ची जबाबदारी सांभाळणाऱ्या व्यक्तीच्या निवेदनानुसार खालील घटना घडल्या
- 28 जानेवारी 2026 रोजी विमान VT-SSK ने सकाळी 08:18 IST वाजता बारामतीशी पहिला संपर्क साधला.
- त्यानंतर विमानाने बारामतीपासून 30 नॉटिकल मैल अंतरावरून येत असल्याची माहिती दिली.
- पुणे अप्रोचने त्यांना रिलीज केले आणि VMC (Visual Meteorological Conditions) मध्ये पायलटच्या निर्णयानुसार उतरण्याचा सल्ला दिला.
- क्रूने वाऱ्याची दिशा आणि दृश्यमानतेबाबत विचारणा केली. त्यांना वारे शांत असून दृश्यमानता सुमारे 3000 मीटर असल्याचे सांगण्यात आले.
- पुढे विमानाने धावपट्टी क्रमांक 11 (Runway 11) च्या अंतिम टप्प्यावर असल्याची माहिती दिली. मात्र धावपट्टी स्पष्टपणे दिसत नसल्याने पहिल्या प्रयत्नात ‘गो-अराउंड’ करण्यात आला.
- गो-अराउंडनंतर विमानाची स्थिती विचारण्यात आली. क्रूने पुन्हा Runway 11 च्या अंतिम टप्प्यावर असल्याचं सांगितलं.
- धावपट्टी दिसते का, अशी विचारणा करण्यात आली असता, सुरुवातीला क्रूने “धावपट्टी सध्या दिसत नाही, दिसल्यावर कळवतो” असे उत्तर दिले. काही सेकंदांनी त्यांनी धावपट्टी दिसत असल्याचे कळवले.
- 08:43 वाजता विमानाला Runway 11 वर लँडिंग क्लिअरन्स देण्यात आला. मात्र या क्लिअरन्सला कोणताही प्रतिसाद (Readback) मिळाला नाही.
- 08:44 वाजता ATC कर्मचाऱ्यांनी Runway 11 च्या थ्रेशोल्डजवळ आग लागलेली पाहिली. तातडीने आपत्कालीन सेवा घटनास्थळी पाठवण्यात आल्या.
- विमानाचे अवशेष Runway 11 च्या थ्रेशोल्डसमोर, धावपट्टीच्या डाव्या बाजूला आढळून आले.
