TRENDING:

Ajit Pawar : शेवटच्या सेकंदात विमानासोबत काय घडलं? अजित पवार प्लेन क्रॅशचा Original रडार व्हिडिओ समोर

Last Updated:

Ajit Pawar plane crash : या अपघाताशी संबंधीत एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ फ्लाइट रडारचा आहे. जो एअर ट्राफिक कंट्रोलरकडे असतो. ज्यामध्ये विमानाची दिशा, सध्याचं लोकेशन, अल्टिट्यूड अशा सगळ्या गोष्टी दिसतात. अजित पवारांच्या विमानासोबत शेवटच्या क्षणी काय घडलं हे या फ्लाइट रडारमध्ये दिसत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : काही वेळा नियती अशी खेळी खेळते की, आपण कितीही तयारी केली तरी तिच्यापुढे काही चालत नाही. बारामतीच्या मातीत लहानाचे मोठे झालेले आणि इथल्या कणाकणात मिसळलेले व्यक्तिमत्व म्हणजे अजित दादा. पण कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल की, ज्या मातीने त्यांना ओळख दिली, त्याच मातीच्या कुशीत त्यांचा असा दुर्दैवी अंत होईल.बुधवारी सकाळी घडलेली ही घटना केवळ एक बातमी नाही, तर एका युगाचा आणि काही स्वप्नांचा करुण शेवट आहे.
अजित पवार विमान अपघात
अजित पवार विमान अपघात
advertisement

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती विमानतळाजवळ विमान अपघातात अंत झाला. या बातमीने संपूर्ण राज्य सुन्न झाले आहे. हा अपघात कसा घडला, त्यावेळी काय घडलं? शेवटच्या क्षणी विमानात काय परिस्थीती होती? असे असंख्य प्रश्न उद्भवत आहेत. लोक हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की नक्की काय घडलं?

advertisement

खरंतर या अपघाताशी संबंधीत एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ फ्लाइट रडारचा आहे. जो एअर ट्राफिक कंट्रोलरकडे असतो. ज्यामध्ये विमानाची दिशा, सध्याचं लोकेशन, अल्टिट्यूड अशा सगळ्या गोष्टी दिसतात. अजित पवारांच्या विमानासोबत शेवटच्या क्षणी काय घडलं हे या फ्लाइट रडारमध्ये दिसत आहे.

सकाळी 08.10 वाजता मुंबईच्या धावपळीतून अजित दादांनी बारामतीकडे उड्डाण घेतले. त्यांच्यासोबत त्यांचे खासगी सुरक्षा रक्षक विदित जाधव आणि अटेंडंट पिंकी माळी होत्या. विमानाचे पायलट प्रदीर्घ अनुभव असलेले कॅप्टन सुमित कपूर आणि तरुण तडफदार कॅप्टन शांभवी पाठक होते.

advertisement

सकाळी 08:37 च्या सुमारास विमान बारामतीच्या आकाशात पोहोचले. बारामतीची ती धावपट्टी पूर्णपणे धुक्यात झाकलेली होती. त्यामुळे विमान उतरवताना अडचण येत होती. वैमानिकांनी एकदा प्रयत्न केला, पण समोर काहीच दिसत नसल्याने त्यांनी विमान सुरक्षितपणे पुन्हा हवेत नेले आणि पुन्हा योग्य ऍगल पाहून त्यांनी युटर्न घेतला आणि पुन्हा लँडिंगचा प्रयत्न केला.

रडार डेटा सांगतो की, विमानाने हवेत एक मोठा वेढा घातला आणि दुसऱ्यांदा उतरण्याचा प्रयत्न केला. 08:45 वाजता विमान धावपट्टीच्या अगदी जवळ आले होते. पण त्याच क्षणी विमानाचे नियंत्रण सुटले. विमान जमिनीवर आदळले आणि एका भीषण स्फोटासह आगीच्या विळख्यात आले.

advertisement

स्थानिक नागरिक धावत तिथे पोहोचले, पण आगीच्या ज्वाळा इतक्या भयानक होत्या की कोणालाही वाचवणे शक्य झाले नाही. ज्या नेत्याला पाहण्यासाठी हजारो लोक जमा होणार होते, त्यांच्या नशिबी असा शेवट आला, हे पाहून प्रत्येकाला अश्रू अनावर झाले आहेत.

कर्तव्य बजावताना संपलेली दोन तरुण आयुष्य

या अपघातात केवळ राजकीय हानी झाली नाही, तर दोन कुटुंबांचे आधारस्तंभही गेले.

सैन्य दलाची शिस्त रक्तात असलेल्या शांभवी यांनी आकाशात भरारी घेण्याचे स्वप्न पाहिले होते. मुंबई विद्यापीठाची पदवी आणि न्यूझीलंडमधील प्रशिक्षण घेऊन त्या एका उज्ज्वल भविष्याकडे पाहत होत्या.

तर अवघ्या २९ वर्षांच्या पिंकी माळी आपल्या कुटुंबासाठी कष्ट करत होत्या. अपघातापूर्वी काही वेळ आधीच त्यांनी आपल्या वडिलांशी आनंदाने संवाद साधला होता. पण तो त्यांचा शेवटचा फोन ठरेल, असं कोणालाच वाटलं नव्हतं. सोबतच अनुभवी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कोरियन टॉप्सची जोरदार क्रेझ, फक्त 300 रुपयांपासून करा खरेदी, मुंबईत हे लोकेशन
सर्व पहा

महाराष्ट्राच्या राजकारणातील एका पर्वाचा असा शेवट होईल, याची कल्पना कोणीच केली नव्हती. शिस्त, कामाचा उरक आणि रोखठोक स्वभाव यासाठी ओळखले जाणारे 'दादा' आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत.

मराठी बातम्या/पुणे/
Ajit Pawar : शेवटच्या सेकंदात विमानासोबत काय घडलं? अजित पवार प्लेन क्रॅशचा Original रडार व्हिडिओ समोर
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल