अरे बाबा तुला लागलं नाय ना... तुला गाडी चालवता येईल का? की कुणाल सोडायला सांगू, असं म्हणत अजित पवार यांनी त्याची विचारपूस केली. गाडी घेऊन हळू जा.. घाबरू नको, असं म्हणत अजित पवारांनी त्याला धीर दिला. त्यावेळी काही वेळ ट्रॅफिक देखील जाम झाल्याचं दिसलं. अजितदादांना पाहून अनेकांनी आपल्या गाड्या वळवल्या. त्यामुळे दादांनी तिथून लवकर जाणं पसंत केलं.
advertisement
पाहा Video
अजित पवार पुन्हा आपला बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी आक्रमक प्रचार करण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये उतरले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या 9 वर्षांतील भाजपाच्या सत्ताकाळात झालेल्या भ्रष्टाचारावरून सातत्याने आरोप करीत आहे. गुंडगिरी, दादागिरी व दहशत माजवून महापालिका अक्षरश: लुटून खाल्ल्याचा तोफ त्यांनी भाजपाचे आमदार महेश लांडगे यांचे नाव न घेता डागली होती.
दरम्यान, अजित पवार यांच्यावर महेश लांडगेंनी हल्लाबोल केला. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. ‘पिंपरी-चिंचवडमधील भ्रष्टाचाराच्या ‘आका’ला संपवायचे आहे,’ असे विधान पवारांनी केल्यानंतर, बुधवारी आमदार लांडगे यांनी प्रत्युत्तर देत अजित पवार हेच राज्यातील भ्रष्टाचाराचे ‘आका’ असल्याचा आरोप केला आहे.
