शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार मैदानात उतरल्या. ननंद-भावजय, मुलगी-सून, राष्ट्रवादीचे दोन गट तसंच महाआघाडी आणि महायुती अशी ही लढत. त्यामुळे या लढतीकडे फक्त राज्यच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं. बहुतांश सामान्य बारामतीकर शरद पवार यांच्यासोबत भावनिकरित्या जोडलेले आहेत तर दुसरीकडे अजित पवारांनी बारामतीचा कायापालट केला आहे. प्रचारासाठी दोघांनी जोर लावला होता.
advertisement
बारामती विधानसभा मतदारसंघात 2 लाख 56 हजार 531 इतकं मतदान झालं आहे. दौंड विधानसभा मतदारसंघात 1 लाख 83 हजार 658 मतदान झालं आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघात मतदान 2,17,173 मतदान झालं आहे. पुरंदर विधानसभा मतदारसंघात एकूण मतदान 2,31,679 मतदान झालं आहे. भोर विधानसभा मतदारसंघात एकूण 2,45,215 मतदान झालं आहे. तर सगळ्यात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात 2 लाख 77 हजार 365 मतदान झालं आहे. त्यामुळे या सगळ्या प्रमुख भागामध्ये झालेल्या मतदानावरच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांचं भवितव्य अवलंबून आहे.
भावजयीबाबत बोलताना ननंद भावुक
दरम्यान जेव्हा लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली होती तेव्हा सुप्रिया सुळे सुनेत्रा पवारांबाबत बोलताना भावुक झाल्या होत्या. माझी लढाई ही कोणत्याही व्यक्तीविरोधात नाहीये, मी कोणावरही व्यक्तीगत टीका केलेली नाहीये. माझी लढाई ही बेरोजगारी, दडपशाही विरोधात असणार आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं.. मोठ्या भावाची बायको ही आई समान असते आणि त्यांनी आमच्या आईला निवडणुकीत उतरवलं, आईला निवडणुकीच्या रिंगणात उतरून त्यांना निवडणूक लढवावी लागते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती.