धनंजय देशमुख काय म्हणाले?
आमचं दुःख आणि कस्पटे कुटुंबीयांचं दुःख सारखं आहे, आमचा पण माणूस गेला आहे. छोट बाळ आहे त्यांच्याकडे या दुःखातून सावरण्याचा बळ दिलं पाहिजे, असं धनंजय देशमुख म्हणाले. आरोपींना नक्कीच हे सगळे भोग आहेत भोगावे लागणार. पण माझी इच्छा आहे की, कस्पटे कुटुंबांना यातून पुढं यावं. खरी परीक्षा तर आता पुढं आहे. आपल्याला सिद्ध करावं लागणार आहे, त्यासाठी योग्य दिशा शोधली पाहिजे, असंही धनंजय देशमुख म्हणाले.
advertisement
आमच्या भावान काय पाप केलं?
आमच्यासारखं कस्पटे कुटुंबीयांना न्याय घरी बसून नाही मिळत, त्यासाठी रस्त्यावर यावं लागतं. उपोषण करावं लागतं, असंही धनंजय देशमुख म्हणाले. आमच्या भावान काय पाप केलं होतं? परंतु आम्हाला आता न्याय मागावा लागत आहे, असंही धनंजय देशमुख म्हणाले आहेत.
दरम्यान, हुंडा बळी प्रकरणात 23 वर्षाच्या वैष्णवी शशांक हगवणे हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. तर संतोष देशमुख प्रकरणात आरोपींना अटक केली गेली असून कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. त्यामुळे आता दोन्ही प्रकरणामुळे अजित पवार यांची कोंडी होत असल्याचं पहायला मिळतंय.