सूनेच्या जाचामुळे 80 वर्षाच्या उतरत्या वयातील वृद्धेचं आयुष्य वेदनादायी बनलं आहे. सून तिला घरातील सगळी कामं करायला लावण्यापासून ते उपाशी ठेवण्यापर्यंत सर्व प्रकारचा त्रास देते. अखेर हा त्रास सहन न झाल्याने वृद्ध महिलेनं मुलगा आणि सुनेविरोधात कौटुंबिक हिंसाचारांतर्गत न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयाने मुलगा आणि सुनेविरोधात निकाल दिला आणि वृद्ध महिलेला मोठा दिलासा दिला.
advertisement
कोर्टाने त्यांना वृद्ध महिलेविरुद्ध घरगुती हिंसाचाराचं कोणतंही कृत्य करण्यास मनाई केली. तसंच संयुक्तपणे किंवा वैयक्तिकरित्या घरगुती हिंसाचाराच्या कृत्यांमुळे झालेल्या दुखापतींसाठी महिलेला दोन महिन्यांच्या आत प्रत्येकी 2 लाख रूपये देण्याचे आदेशही महिलेचा मुलगा आणि सूनेला दिले.
काय म्हणावं यांना! बिबट्याआधी माणसंच उचलतायेत पिंजऱ्यात ठेवलेली कोंबडी; वनविभागही हैराण
महिलेचा मुलगा आणि सून दोघांचाही आधी घटस्फोट झालेला असून हे दोघांचंही दुसरं लग्न आहे. वृद्ध महिलेनं ते स्विकारलंही. तिघंही एकाच घरात राहू लागले. वृद्ध महिलेला ऑस्टियोपोरोसिस, पायात फ्रॅक्चर असे आजार आहेत. मात्र. तरीही ती घरातली कामं करायची. सून सासूला सतत टोमणे मारून बोलायची.
मुलगा आणि सून दोघंही तिची काळजी घेत नव्हते. सून तिला जेवण देत नसायची, उपाशी ठेवायची. हे घर माझं आहे, तू निघून जा, असं सासूला सतत म्हणायची. अखेर या त्रासाला कंटाळून वृद्ध महिलेनं सुनेविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली यानंतर वृद्ध महिलेनं अॅड. स्मिता देशमुख यांच्यामार्फत मुलगा आणि सुनेविरुद्ध कौटुंबिक हिंसाचारांतर्गत न्यायालयात दावा दाखल केला आणि त्यांना न्यायही मिळाला.
